Cannes 2025 : गुलाबी साडी आणि.... छाया कदमची दुसऱ्यांदा 'कान्स' नव्हे, कुटुंब वारी

छाया कदम ही अभिनेत्री कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अचंबित करते. दुसऱ्यांदा कान्सला गेलेल्या छाया कदमने केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 16, 2025, 06:17 PM IST
Cannes 2025 : गुलाबी साडी आणि.... छाया कदमची दुसऱ्यांदा 'कान्स' नव्हे, कुटुंब वारी

Chhaya Kadam Pink Saree Look : कान्सच्या रेड कार्पेटवर प्रत्येकाला आपलं वेगळेपण दाखवायचं असतं. जगभरातील सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर केले जात आहेत. कान्स महोत्सवात मराठमोळी अभिनेत्री छाया कदम गुलाबी रंगाची साडीत दिसली. या प्रकारच्या साडीत ती खूप सुंदर दिसते. 

छाया कदमचा गुलाबी साडीचा लुक

कान्स फेस्टिव्हलमध्ये छाया कदमने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या प्रकारच्या साडीत ती खूप सुंदर दिसत आहे. साडी साधी आहे पण डबल शेडसह तिला अधिक आकर्षक बनवलं आहे. त्यात एक फ्रिल डिझाइन तयार करण्यात आले आहे. यामध्ये छाया कदम खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. तिने साडी वॉटरफॉल स्टाईलमध्ये नेसली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

राऊंड नेक ब्लाऊज 

लुक अधिक क्रिएटिव बनवण्यासाठी छाया कदमने साडीसोबतच राऊंड नेकलाइन ब्लाऊज कॅरी केला आहे. या लूकमध्ये छाया कदमचा ग्लॅमरस लूक अधिक आकर्षित दिसत आहे. यामध्ये कोणत्याही इतर गोष्टी वापरण्यात आल्या नाही. त्यामुळे अतिशय साध्या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे. तसेच या ब्लाऊजच्या स्लीव्सला तिला एलबोपर्यंत ठेवले आहे. तसेच ब्लाऊजच्या नेकलाइनवर पायपिन केली आहे. 

दागिने आणि मेकअप लूक

गुलाबी रंगाची साडी आकर्षक दिसण्यासाठी तिने दागिने आणि मेकअप साधा ठेवला आहे. यामुळे ती साडीत खूपच सुंदर दिसत आहे. ऑक्सिडाइज्ड दागिने, कपाळावर टिकळी आणि मेकअपमुळे एक साधा लूक निर्माण झाला आहे. तिने तिच्या हेअरस्टाईलमध्ये एक आकर्षक अंबाडा बनवला आहे. यामुळे लूक खूपच सुंदर दिसतो.

गेल्या वर्षीही छाया कदम तिच्या लूकमुळे खूपच चर्चेत होती. यावेळीही लोकांना तिचा साडीचा लूक खूप आवडला आहे. जे तिने अगदी सोप्या पद्धतीने तयार केले आहे. या लूकमधील तिचे फोटोही खूपच गोड असून यासोबतची पोस्ट चर्चेत आहे.