कंगवा की फणी? केसांच्या आरोग्यासाठी काय नेमकं काय वापरावं? जाणून घ्या

Hair Tips In Marathi: केसांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी काय वापरावे, जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 20, 2025, 01:46 PM IST
कंगवा की फणी? केसांच्या आरोग्यासाठी काय नेमकं काय वापरावं? जाणून घ्या
comb or hair brush which is better for healthy hair

Hair Tips In Marathi: हल्ली अपुरी झोप, बिघडलेली लाइफस्टाइल आणि जंक फुड याचा परिणाम शरीरावर तर होतोच पण केसांचे आरोग्यदेखील बिघडते. केसाचे आरोग्य सुधारावे यासाठी विविध शॅम्पू आणि कंडिशनर वापरले जातात. पण तुम्हाला माहितीये का तुम्ही जो कंगवा वापरता त्याचा देखील केसगळतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं केसांच्या उत्तम आरोग्यासाठी फणी वापरावी कि कंगवा, हे जाणून घेऊयात.

अनेकदा योग्य कंगव्याची निवड न केल्यामुळं केस तुटतात त्यामुळं सर्वात आधी योग्य कंगव्याची निवड करावी त्यामुळं केसांची स्थिती सुधारू शकते. आता सगळ्यात आधी कंगवा म्हणजे काय आणि फणी म्हणजे काय? या दोघांमधील अंतर जाणून घेऊयात.

कंगवा म्हणजे काय?

कंगवा हा केस विंचरण्यासाठीच वापरला जातो. कंगव्याचे दात छोटे आणि सॉफ्ट असून एकसमान असतात. कंगवा सहजतेने केसात जातो आणि केस विंचरले जातात. लाकडाचा आणि प्लास्टिकचे कंगवे बाजारात सहजतेने मिळतात.

कंगव्याचा फायदा

कंगव्यामुळं केसांचा पोत टिकून राहतो तसंच, ते सहज केसांत जातो आणि केस विंचरले जाातत. त्यामुळं केस कमी तुटले जातात.

फणी म्हणजे काय?

फणी ही बारीक दातांची असते. तिचे दात लहान असतात. जर तुमचे केस लहान असतील तर तुम्ही ती वापरू शकता. कधीकधी फणीचा वापर स्टायलिंगसाठीदेखील केला जातो.

कुरळे केस

जर तुमचे केस कुरळे असतील तर रुंद दाताचा कंगवा वापरा. यामुळं केस तुटत नाहीत आणि गुंत नीट काढता येते. तसंच, केस छान मोकळे होतात आणि केस हाताळणे अधिक सोप्पे होते.

मऊ आणि रेशमी केस

तुमचे केस मऊ आणि रेशमी असल्यास तुम्ही बारीक दातांची फणी वापरू शकता. त्यामुळं केसांतील गुंत लवकर निघते आणि पोतदेखील टिकून राहतो. केस जर पातळं असतील तर ही पद्धत फायदेशीर आहे.

घनदाट केस

घनदाट केस असतील तुम्ही कंगवाचाच वापर केला पाहिजे. कारण मोठ्या दातांचा कंगवा वापरल्यास तो केसांच्या मुळापर्यंत पोहोचतो आणि गुंत व्यवस्थित निघते.

कोरडे केस

जर तुमचे केस कोरडे झालेत याचा अर्थ त्यांना पोषक योग्य मिळत नाहीये. केसांना चांगले पोषण मिळावे यासाठी लाकडाच्या कंगव्याचा वापर करावा. लाकडाचा कंगना स्कॅल्पला मालीश करतो आणि केसांनाआवश्यक पोषक देतो. लाकडाच्या कंगव्यामुळं केस तुटत नाहीत आणि गुंता देखील होत नाही.