Winter Season : देशातील सर्व भागात आता थंडीचा तडाखा वाढू लागला आहे. बऱ्याच ठिकाणी दिवसभर वातावरण थंड असतं, मात्र शरीराला या हवामानाची फार सवय नसल्याने या वातावरणामुळे व्हायरल आजारांचा धोका वाढतो. थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप सारखे आजार वाढतात तर त्वचेवर देखील रॅशेज येऊ लागतात. अशावेळी हिवाळ्यात बाहेर पडताना शरीरातील काही भाग हे गरम कपड्यांनी झाकून ठेवावे. अन्यथा त्वचा, हाड आणि टिश्यूजला खूप नुकसान पोहोचू शकते.
डोकं : शरीरातील बरीच उष्णता डोक्यातून बाहेर पडू शकते. तसेच हिवाळ्यात डोकं हे लवकर थंड होतं, अशावेळी बाहेर पडताना तुम्ही डोक्यात उबदार टोपी घाला किंवा स्कार्फ बांधून ठेवा. यामुळे उष्णता टिकून राहण्यास मदत होते.
मान : मान हा शरीरातील एक असा भाग आहे जो त्वरित उष्णता गमावतो. अशावेळी उबदार स्कार्फ किंवा नेक गेटर शरीराचे थंडीपासून संरक्षण करते.
हात : हात आणि हाताची बोट ही खूप संवेदनशील असल्याने हिवाळ्यात ती लवकर थंड पडतात. तेव्हा हाताचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही हातमोजे घालू शकता.
पाय : हिवाळ्यात पाय थंड पडतात आणि त्यामुळे सांधेदुखी समवेत शरीराच्या विविध समस्या जाणवू शकतात. अशावेळी पायात तुम्ही उबदार मोजे, बूट इत्यादी घालू शकता.
हेही वाचा : शांत व लवकर झोप येण्यासाठी काय करायचे? हे 10 उपाय वापरुन पाहा!
कान : हिवाळ्यात थंड हवा सुरु असताना कान उघडे असल्यास थंड हवा कानाला लागते आणि त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अशावेळी तुम्ही कानात कापूस किंवा कानटोपी वापरून थंड हवा कानात जाणार नाही याची काळजी घेऊ शकता.
स्नायू दुखणे आणि सांधेदुखी : काही लोकांना हिवाळ्यात थंडीमुळे स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास वाढतो. थंड हवेमुळे स्नायूंमध्ये तणाव निर्माण होतो आणि त्याला इजा होण्याची देखील शक्यता असते. अशावेळी हिवाळ्यात स्नायू किंवा सांधेदुखीचा त्रास वाढला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्यावेत.
हायपोथर्मिया ही शरीरातील तापमानाची एक धोकादायक घसरण जी तुम्ही खूप वेळ थंड तापमानाच्या संपर्कात आल्याने उद्भवू शकते. यामुळे शरीरातील चेतना कमी होते, हृदयाची गती आणि श्वासोच्छवासाचा वेग कमी होतो. तसेच अशा परिस्थितीत ब्लड प्रेशर सुद्धा कमी होतो. थंडीपासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी तुम्ही उबदार टोपी, कानटोपी, चेहऱ्यावर स्कार्फ, गॉगल घालू शकता. तसेच गरम पेय पदार्थांचे सेवन करू शकता. तसेच शरीर गरम ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम करा आणि शरीर सतत सक्रिय राहील असं पाहा.
ENG
(96 ov) 364 (113 ov) 471
|
VS |
IND
00(0 ov) 465(100.4 ov)
|
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.