)
Pillows Also Have An Expiry Date : खाण्याची वस्तू असो किंवा औषधं... या वस्तू खरेदी करताना त्यांची वारण्यासाठीची अंतिम तारीख पाहण्याची अनेकांनाच सवय असते. फक्त या वस्तूच नव्हे तर, दैनंदिन वापरात येणाऱ्या स्किनकेअर प्रोडक्ट इतकंच काय तर, मसाल्यांच्यासुद्धा Expiery Date असतात. जाणून आश्चर्य वाटेल, पण व्यक्तीच्या दैनंदिन वापरात असणाऱ्या उशीचीसुद्धा एक्सपायरी डेट अर्थात वापरासाठीची अंतिम तारीख असते.
प्रसिद्ध आरोग्य मार्गदर्शक डॉ. मनन वोरा (Dr. Manan Vora) यांनी माहिती देत उशी नियमितपणे बदलली जाणंही महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. याकडे दुर्लक्ष केल्यास फक्त झोपमोडच नव्हे तर आरोग्यावरही याचे परिणाम दिसून येतात असं त्यांनी सांगितलं. नुकतंच इन्सटाग्रामवर त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओसुद्धा शेअर केला. जिथं त्यांनी उशीची एक्सपायरी डेट, कोणती उशी नेमकी किती काळ टिकते या आणि अशा कैक प्रश्नांची उत्तरं दिली.
डॉ. वोरा यांच्या सांगण्यानुसार उशीलासुद्धा Expiry Date असणं गरजेचं आहे. कारण, त्याचा दिवसातून 8 ते 10 तासांसाठी आपण वापर करतो. उशी थेट मनुष्याचा चेहरा आणि नाकाच्या संपर्कात येते. त्यांच्या माहितीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती झोपी जाते तेव्हा ही उशी त्या व्यक्तीच्या सर्वाधिक संपर्कात असते. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे उशीवर त्वचेतील मृत पेशी, लाळ, शारीरिक सिक्रीशन आणि त्वचेतील तैल घटक, धुळीचे कण दमा होतात. काही उशा पॉलियुरेथेनसारख्या कृत्रिम घटकांपासून तयार झालेल्या असतात, ज्या काळानुरूप तुटून त्यातून काही घटक बाहेर पडू शकतात.
नियमित वापरात असणारी उशी नियमित स्वरुपात स्वच्छ केली नाही, तर त्यामुळं त्वचेशी संबंधित समस्या बळावतात. अॅलर्जी, मुरुमं येणं, त्वचा जळजळणं इथपासून ते अगदी फुफ्फुसांमध्ये संसर्गापर्यंतची वेळ ओढावते असंही वोरा यांनी स्पष्ट केलं.
डॉ. वोरा आंच्या माहितीनुसार उशी नेमकी कोणत्या गोष्टींपासून तयार झाली आहे, त्यानुसार ती नेमकी किती काळ टिकू शकते हे निर्धारित होतं. पॉलिस्टरची उशी सहसा 6 महिने ते 2 वर्षांसाठी टिकते. तर, पक्ष्यांच्या पिसांपासून तयार झालेली उशी 1 ते 3 वर्षांपर्यंत वर्षांपर्यंत टिकते. मेमरी फोमपासून तयार झालेली उशी 2 ते 3 वर्षांपर्यंत टिकते. नव्या तंत्रज्ञानापासून तयार झालेली उशी असल्यास ती साधारण 3 ते 4 वर्षांपर्यंत टिकते. बकव्हीटपासून तयार झालेली उशी सर्वाधिक काळ म्हणजेच 3 ते 5 वर्षांपर्यंत टिकते. उशी कायमच एखाद्या उपकरणाजवळ असल्यानं तिची स्वच्छता राखण्यापासून वेळीच उशी बदलण्याच्या सूचना केल्या जातात.
उशीला एक्सपायरी डेट का असते?
उशीला एक्सपायरी डेट असणे गरजेचे आहे, कारण दिवसातून 8 ते 10 तास ती आपल्या चेहऱ्याशी आणि नाकाशी संपर्कात असते. त्यावर मृत त्वचापेशी, लाळ, घाम, तेलकट घटक, धूळीचे कण आणि डास्ट माइट्स साठतात.
उशी नियमित बदलली नाही तर काय होऊ शकते?
डॉ. मनन वोरा यांच्या मते, उशी नियमित स्वच्छ न केल्यास त्वचेच्या समस्या वाढतात. अॅलर्जी, मुरुमं, जळजळण, फुफ्फुसांमध्ये संसर्ग होऊ शकतो.
उशीची स्वच्छता कशी राखावी?
उशी नियमित धुवा, सूर्यप्रकाशात वाळवा आणि उपकरणांपासून दूर ठेवा. कव्हर वापरा आणि आठवड्यातून एकदा हलके पाणी आणि साबणाने स्वच्छ करा.