Health : बदलेली जीवनशैली, कामाचा ताण, स्पर्धा, आणि भेसळयुक्त वस्तू, तसंच बाहेरच्या खाण्यावर कल असल्यामुळे आज आरोग्याचा अनेक समस्या निर्माण झाला आहे. अनहेल्थ खाणं आणि तेही अवेळी, त्यात व्यायमाचा अभाव यामुळे कमी वयात हृदयविकाराची समस्या, त्यासोबत कॅन्सर आणि मधुमेहाचे असंख्य रुग्ण आढळून येत आहेत. एका संशोधनानुसार असा दावा करण्यात येत आहे, तुमचा रक्त गट तुम्हाला भविष्यात तुम्हाला सर्वाधिक कोणत्या आजाराचा धोका आहे, हे सांगतात.
तुम्हाला माहितीच आहे साधणार रक्त गटाचे 8 प्रकार असून A+, A-, B+, B-, O+, O-, AB+ किंवा AB- हे आहेत. प्रत्येक व्यक्तीला हा त्याचा रक्तगट माहिती असणे फार गरजेचे आहे. तर तज्ज्ञ सांगतात तुमचा रक्त तुम्हाला कुठल्या आजाराचा धोका आहे हे सांगते. चला मग तुमच्या रक्तगटानुसार कोणता आजार होण्याची शक्यता आहे पाहूयात.
AB रक्तगट असलेल्या व्यक्तींना स्मरणशक्ती कमकुवत असण्याची भीती जास्त असते. तर एका अभ्यासात असं सांगण्यात आलं की, AB रक्तगट असलेल्या लोकांमध्ये स्मृती-संबंधित समस्या ही सामान्य बाब आहे.
O रक्तगट असलेल्या व्यक्तीला जेव्हा संक्रमित डास तुम्हाला चावतो तेव्हा तुम्हाला मलेरिया होऊ शकतो. त्याला कारणीभूत असलेल्या परजीवीला O रक्त असलेल्या लोकांशी जोडणे कठीण आहे.
पेप्टिक अल्सरला म्हणजेच पोटाचा अस्लर हा O रक्तगट असलेल्या व्यक्तींना होण्याची भीती असते. या आजारात तुमच्या पोटाच्या किंवा आतड्याच्या वरच्या भागात जखमा होतात. ज्यामुळे रुग्णाला खाणे-पिणे कठीण होते आणि वेदनाही असह्य होतात.
'O' रक्तगट असलेल्या लोकांना हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्ग होण्याची भीती सर्वाधिक असते. या संसर्गामुळे पोट आणि लहान आतड्याला संसर्ग होतो. अशा लोकांना कॉलरा, एस्चेरिचिया कोलाय आणि नोरोव्हायरसमुळे होण्याचा अधिक भीती असते.
O रक्त गट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वात कमी असला तर AB आणि B प्रकार असलेल्या लोकांना जास्त धोका असल्याचा तज्ज्ञ सांगतात. डॉक्टर एबी आणि बी रक्तगट असलेल्या लोकांना हृदयासाठी निरोगी आहार आणि सवयींचे पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
तर रक्तगट A किंवा AB असलेल्या लोकांना पोटाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असून तुमचा रक्तगट A, B किंवा AB असल्यास, तुम्हाला स्वादुपिंडाचा कर्करोगची सर्वाधिक असतो. जर तुम्ही या गटात येत असाल तर तुम्ही कॅन्सरशी लढा देणारे पदार्थ जास्त प्रमाणात खावे, असं डॉक्टर सांगतात.
A ब्लड ग्रुप असल्यास तुम्हाला तणावाचा सामना अधिक करावा लागतो. A प्रकार असलेल्या लोकांच्या शरीरात कॉर्टिसोल, एक तणाव संप्रेरक, पातळी वाढते. चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी निरोगी आहार आणि व्यायाम यासारख्या उपायांकडे लक्ष द्या.
अलीकडील संशोधन असं सांगतात की, 'O' रक्तगट असलेल्या महिलांना FSH, किंवा फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (महिलांमध्ये ओव्हुलेशनसाठी जबाबदार असणारा हार्मोन) गर्भधारणा-संबंधित समस्या असू शकतात. त्यामुळे कमी अंडी तयार होतात. दुसरीकडे दुसऱ्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना असे आढळून आलंय की, 'बी' रक्तगट असलेल्या महिलांमध्ये 'ओ' रक्तगट आणि 'ए' रक्तगट असलेल्या महिलांपेक्षा आयव्हीएफ यशस्वीतेचे प्रमाण जास्त असतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)