Holi 2024 होळी खेळताना 'अशी' घ्या त्वचेची काळजी

रंगांची उधळण आणि उत्साहाचा सण म्हणून 'होळी' साजरी करतात. पूर्वीच्या काळी होळी नैसर्गिक रंगांनी खेळली जात असतं. त्या रंगांमुळे त्वचेला किंवा शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. मात्र आता तसं होत नाही. काळ बदलला तसं सण साजरे करण्याची पद्धत ही बदलत गेली. 

Updated: Mar 13, 2024, 02:29 PM IST
Holi 2024 होळी खेळताना 'अशी' घ्या त्वचेची काळजी  title=

आजकाल होळीकरीता बाजारात उपलब्ध असलेल्या रंगांवर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या केमिकलमिश्रित  रंगांचा गंभीर परिणाम त्वचेवर होतो.बऱ्याच जणांची त्वचा ही अतिसंवेदनशील असते. त्यामुळे काही जणं होळी खेळणं टाळतात. म्हणूनच जाणून घेऊया होळी खेळताना त्वचेची काय काळजी घ्यावी.

केमिकल मिश्रित रंग तुमच्या त्वचेला हानिकारक असतात. त्वचा रुक्ष पडणं, जळजळणं, तसंच केस कोरडे पडणं या समस्या उद्भवतात. होळी खेळण्यापूर्वी त्वचेला आणि केसांना तेल लावणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे रंगांमध्ये असलेल्या केमिकलमुळे त्वचेला खोलवर ईजा होत नाही. हे केमिकल रंग तेलामुळे लवकर निघून जाण्यास मदत होते.

मॉइश्चराइज
तुमची त्वचा कोरडी असो किंवा तेलकट असो. त्वचेचा प्रकार जाणून घेत योग्य मॉइश्चराइजर वापरणं फायदेशीर ठरतं. त्वचा  संवेदनशील असल्याने कोणत्याही प्रकारच्या केमिकल किंवा प्रदूषणाचा दुष्परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होतो. केमिकल रंगांमुळे निर्सगत: तयार होणारे सिबम ऑईल निघून जाते.  त्यामुळे त्वचा कोरडी पडते. मॉइश्चराइजर त्वचेतला ओलावा टिकून ठेवते. त्यामुळे रंग खेळून झाल्यावर मॉइश्चराइज लावणं गरजेचं आहे.

त्‍वचेला हायड्रेट करणं
तज्ज्ञांच्या मतानुसार, रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढून चेहरा साफ करावा. मेकअप असो किंवा होळीचे रंग, यातल्या रासायनिक घटकांमुळे त्वचेची रोमछिद्र बंद होतात. त्यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळणं कठीण होतं. योग्य क्लिंजर वापरून चेहरा साफ करावा. त्यानंतर स्कीनला सूट करणारा टोनर लावावं. असं केल्यास त्वचेला पोषणतत्व मिळतात.

स्क्रब करणं
त्वचेशी केमिकलचा थेट संबंध आल्याने त्वचेचा पोत बिघडतो.  डेड स्कीनपासून सुटका मिळवण्यासाठी स्क्रब फायदेशीर ठरतो. स्क्रबने चेहऱ्याला हलका मसाज केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.

केसांची काळजी कशी घ्याल ?
केसांची मुळं अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे केमिकलचा डायरेक्ट संबंध केसांशी आल्यास केस गळणं, स्कॅल्प कोरडी पडणं  आणि कोंडा होणं अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच केमिकल रंगाचा प्रभाव पडू नये याकरीता रुट मास्कचा वापर केला जातो. तसंच होळी खेळल्यानंतर केस धुतल्यावर ओल्या केसांवर कंगवा फिरवू नये, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.