Diwali 2025: दिवाळीपूर्वी चमकवा तांब्याची भांडी, फॉलो करा 'हे' 4 सोपे घरगुती उपाय; करतील कमाल!

Copper Vessel Cleaning: दिवाळी पूजेपूर्वी, जुनी तांब्याची भांडी नव्यासारखी तुम्ही करू शकता यासाठी फक्त या ४ पद्धती वापरा आणि ज्यामुळे भांडी पुन्हा नवीनसारखी होतील.  

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 10, 2025, 03:17 PM IST
 Diwali 2025: दिवाळीपूर्वी चमकवा तांब्याची भांडी, फॉलो करा 'हे' 4 सोपे घरगुती उपाय; करतील कमाल!

How to clean copper utensils: दिवाळी जवळ आली की घराघरात साफसफाईचा धडाका सुरू होतो. पूजा-पाठात वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या भांड्यांना खास महत्त्व असते. मात्र, वर्षभर वापरानं ही भांडी काळवंडतात आणि त्यांची ती जुनी झळाळी हरवते. पण काळजी करू नका! या चार सोप्या आणि नक्की काम करतील अशा घरगुती उपायांनी तुम्ही ती पुन्हा नव्यासारखी चमकदार करू शकता.

Add Zee News as a Preferred Source

 1. लिंबू आणि मीठाचा कमाल

हा सर्वात पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. लिंबातील सिट्रिक अॅसिड आणि मीठाचा खडबडीतपणा एकत्र येऊन तांब्यावरील काळी थर सहज काढून टाकतात.

कसं करायचं?

एक लिंबू अर्धा कापून त्यावर थोडं मीठ शिंपडा. आता त्या लिंबाने भांडे हलक्या हाताने घासायला सुरुवात करा. काही क्षणांतच भांडं झळाळू लागेल. इच्छित असल्यास, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून पेस्ट तयार करा आणि ती कपड्यानं लावा.

 2. चिंचेची  जादू

चिंचेतील आंबटपणा तांब्याच्या भांड्यांची झळाळी परत आणण्यात खूप प्रभावी ठरतो.

कसं करायचं?

थोडीशी चिंच अर्धा तास पाण्यात भिजवा. नंतर ती पाण्यातच मळून त्याचा दाट घोळ तयार करा. तो घोळ भांड्यांवर लावून 5–7 मिनिटं ठेवा. मग स्क्रबरने घासून स्वच्छ धुवा. भांडी पुन्हा नव्यासारखी चमकतील.

 3. व्हिनेगर आणि मीठाचं मिश्रण

ज्या भांड्यांवर काळेपणा खूप जास्त जमलेला आहे, त्यांच्यासाठी हा उपाय परफेक्ट आहे.

कसं करायचं?

समान प्रमाणात पांढरा व्हिनेगर आणि मीठ एका भांड्यात मिसळा. त्यात तांब्याची भांडी काही सेकंद बुडवा. जर संपूर्ण भांडे बुडत नसेल, तर एक भाग एकावेळी बुडवा. पाहता पाहता चमक परत येईल.

 4. बेकिंग सोडा आणि लिंबू

बेकिंग सोडाही तांब्याच्या स्वच्छतेसाठी उत्तम आहे.

कसं करायचं?

थोडा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट भांड्यांवर लावून हलक्या हाताने घासा आणि काही मिनिटांनी धुवा. सर्व डाग आणि मळ सहज निघून जातील.

 खास टिप्स फॉलो करा 

भांडी धुतल्यानंतर त्यांना कोरड्या कपड्याने नीट पुसा. जर पाण्याचे थेंब राहिले, तर पुन्हा काळेपणा येऊ शकतो.

 

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More