Indian filter coffee: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल फिल्टर कॉफी बनवा घरीच, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

How to make south Indian filter coffee: 17 व्या शतकात सुरु झालेल्या या साऊथ इंडियन फिल्टर कॉफीचे लाखो चाहते आहे. अस्सल साऊथ इंडियन फिल्टर कॉफी कशी बनवायची हे जाणून घेऊयात. 

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 14, 2024, 03:05 PM IST
Indian filter coffee: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल फिल्टर कॉफी बनवा घरीच, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत title=
Photo Credit: Freepik

Winter Coffee: थंडगार हिवाळ्यात गरमा-गरमा कॉफी पिण्याची एक वेगळीच मजा असते. कॉफीचे अनेक प्रकार आहेत. पण साऊथ इंडियन स्टाईल फिल्टर कॉफी अनेकांना आवडते. साऊथ इंडियन फिल्टर कॉफी हे दक्षिण भारतातील एक पारंपारिक पेय आहे, जे 17 व्या शतकात भारतात कॉफीच्या आगमनानंतर हळूहळू लोकप्रिय झाले. सध्या देशभरात ही मोठ्या प्रमाणावर कॉफीचे सेवन केला जाते. ही कॉफी ताज्या भाजलेल्या आणि ग्राउंड कॉफी बीन्सच्या फिल्टर केलेल्या डेकोक्शनपासून तयार केली जाते, जी दुधात मिसळल्यावर जाड, फेसाळ आणि तीव्र चव असलेले टेस्टी पेय तयार करते. चला तर मग जाणून घेऊया साऊथ इंडियन स्टाईल फिल्टर कॉफी घरी बनवण्याची पद्धत-

जाणून घ्या साहित्य 

  • कॉफी पावडर- 2-3 चमचे
  • पाणी - एक कप
  • दूध - २ कप
  • साखर - चवीनुसार

हे ही वाचा: Chickpea Dosa Recipe: मसाला डोसा खाऊन कंटाळा आलाय? बनवा काबुली चण्याचा चविष्ट डोसा, जाणून घ्या रेसिपी

 

जाणून घ्या कृती 

  • साऊथ इंडियन स्टाईल कॉफी बनवण्यासाठी, एक विशेष स्टील फिल्टर वापरला जातो, ज्यामध्ये दोन भाग असतात. त्याच्या वरच्या भागात दोन चमचे कॉफी पावडर टाका आणि हलके दाबा, म्हणजे कॉफी पावडर चांगली सेट होईल.
  • आता फिल्टरच्या वरच्या भागात हळूहळू गरम पाणी टाका, म्हणजे कॉफी पावडर पूर्णपणे भिजते. पाणी हळूहळू तळाशी जाईल, एक स्ट्रॉंग डेकोक्शन तयार करेल. सुमारे 10-15 मिनिटे सोडा.
  • दुसरीकडे, 2 कप दूध थोडे घट्ट आणि मलाईदार होईपर्यंत छान गरम करा. त्यामुळे कॉफीची चव आणखी छान लागते.

हे ही वाचा: Suji Mendu Vada Recipe: घरी बनवा झटपट मेदू वडा, रविवारचा नाश्ता होईल खास; जाणून रेसिपी

  • आता तयार कॉफी डेकोक्शन कपमध्ये ओता. चवीनुसार साखर घाला आणि नंतर गरम दूध घाला. लक्षात ठेवा की दूध घालताना कॉफी हलकेच हलवा, जेणेकरून ते चांगले मिसळेल.
  • पारंपारिक दक्षिण भारतीय शैलीत फ्रॉथ बनवण्यासाठी, कॉफी एका कपमधून दुसऱ्या कपमध्ये उंचावरून ओता. असे दोन-तीन वेळा केल्याने कॉफी फेसाळते. आता तुमची दक्षिण भारतीय फिल्टर कॉफी तयार आहे, ती गरमागरम प्या आणि ताजेपणा अनुभवा.