How to make Creamy Butter Garlic Chicken: रोजच्या साध्या जेवणापेक्षा काहीतरी खास, थोडंसं हटके आणि चवीलाही हटके असं काहीतरी हवं असतं ना? म्हणूनच खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक स्वादिष्ट आणि झटपट बनणारा संडे स्पेशल डिनर मेनू (Sunday Dinner Recipe) . यामध्ये आहे क्रिमी बटर गार्लिक चिकन, सुगंधी जीरा राईस आणि सोबत थंडसर काकडी-टोमॅटोचं झणझणीत सॅलड. ही रेसिपी केवळ चविष्ट नाही, तर पाहुण्यांसाठी सुद्धा सहजपणे सर्व्ह करता येईल अशी आहे. रविवारीची सुट्टी अजून छान होण्यासाठी वेळ न दवडता पाहुया ही खास क्रिमी बटर गार्लिक चिकन रेसिपी...
बोनलेस चिकन – ५०० ग्रॅम (मध्यम तुकडे करून)
बटर – २ टेबलस्पून
लसूण – ८–१० पाकळ्या (बारीक चिरून)
फ्रेश क्रीम – ½ कप
दूध – ¼ कप
काळी मिरी पूड – १ टीस्पून
चिली फ्लेक्स – १ टीस्पून (ऐच्छिक)
मिक्स हर्ब्स (ओरिगेनो, थायम, बेसिल) – १ टीस्पून
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – सजावटीसाठी
हे ही वाचा: नाश्त्यासाठी बनवा अस्सल मुंबई स्टाइल मसाला सॅंडविच, जाणून घ्या सोपी Recipe
एका कढईत १ टेबलस्पून बटर गरम करून त्यात लसूण घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
त्यात चिकनचे तुकडे टाका व मध्यम आचेवर परतून घ्या जोपर्यंत थोडेसे ब्राउन होत नाहीत.
मीठ, मिरी, आणि चिली फ्लेक्स टाकून चांगले मिसळा.
दूध घालून झाकण ठेवा आणि १०–१२ मिनिटं शिजू द्या.
चिकन शिजल्यावर क्रीम आणि उरलेलं बटर टाकून २–३ मिनिटं हलक्या आचेवर उकळवा.
हर्ब्स टाका आणि गॅस बंद करा.
कोथिंबीर किंवा पार्सली घालून सजवा.
हे ही वाचा: Spring Roll: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा स्प्रिंग रोल! जाणून घ्या रेस्टॉरंट-स्टाईल Recipe
बासमती तांदूळ – १ कप (२० मिनिटं भिजवलेले)
तूप/तेल – १ टेबलस्पून
जिरे – १ टीस्पून
तमालपत्र – १ (ऐच्छिक)
मीठ – चवीनुसार
पाणी – २ कप
पातेल्यात तूप गरम करून त्यात जिरे (आणि तमालपत्र) टाका.
जिरे तडतडले की त्यात भिजवून गाळलेला तांदूळ टाका आणि १–२ मिनिटं परतून घ्या.
त्यात पाणी आणि मीठ घालून उकळा.
नंतर झाकण ठेवा आणि मंद आचेवर तांदूळ शिजू द्या.
शिजल्यावर फोर्कने हलवून मोकळा करा.
हे ही वाचा: विकेंडच्या नाश्त्याला बनवा रव्याचे आप्पे, साऊथ इंडियन Breakfast Recipe जाणून घ्या
काकडी – १, चिरलेली
टोमॅटो – १, चिरलेला
कांदा – १, पातळ चिरलेला
लिंबाचा रस – १ टीस्पून
मीठ व मिरी – चवीनुसार
चाट मसाला – एक चिमूट (ऐच्छिक)
कोथिंबीर/पुदिना
सर्व भाज्या एका भांड्यात घ्या.
त्यात लिंबाचा रस, मीठ, मिरी व चाट मसाला टाका.
कोथिंबीर/पुदिन्याने सजवून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड सर्व्ह करा.
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
108/5(41.3 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.