)
How to Make Dahi Poha Healthy Breakfast Recipe: उन्हाळा कमी होत नाहीये. अवेळी येणारा पाऊस गर्मी जास्त वाढवत आहे. अशावेळी चांगला नाश्ता करणे गरजेचे आहे. नाही तर दिवसभर लागणारी ऊर्जा मिळणार नाही आणि पोटही शांत नसेल. उन्हाळ्यात हलका, थंडावा देणारा आणि पचायला सोपा नाश्ता खाणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा वेळी पारंपरिक आणि हेल्दी रेसिपी कामी येतात. यातलाच एक पर्याय म्हणजे दही-पोहे. हा नाश्ता फक्त १०-१५ मिनिटांत तयार होतो, चविष्ट लागतो आणि शरीरात गारवा निर्माण करतो. चला आज जाणून घेऊयात दही-पोह्यांची सोपी आणि पौष्टिक रेसिपी जी उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहे.
दोन व्यक्तींसाठी दही पोहे बनवण्यासाठी 10-15 मिनिटे वेळ लागेल.
हा नाश्ता उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर आहे. दही-पोहे पचायला हलके असून शरीरात थंडावा निर्माण करतात.