)
How to make raw mango and tomato chutney: बाजारात आंबे आले असले तरी अजूनही सगळीकडे कैरी उपलब्ध आहे. या कैरीचा आवर्जून तुम्ही तुमच्या आहारात समावेश करावा. याचा अनेक पद्धतीने फायदा होतो. दररोज कच्च्या आंब्याची अर्थात कैरीची चटणी खाल्ल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो. कैरीची चटणी खायला खूप चविष्ट लागते. आम्ही ज्या चटणीची रेसिपी सांगत आहोत त्यात कांदा, टोमॅटो आणि संपूर्ण लाल मिरच्या वापरल्या जातात. ही चटणी बनवतानाच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.एकदा ही मसालेदार चटणी बनवून नक्की खा. खास गोष्ट म्हणजे त्याची रेसिपी खूप सोपी आहे. चला चटपटी आणि मसालेदार कैरीची चटणी कशी बनवायची ते जाणून घ्या.
2 कैरी, 2 टोमॅटो, 3-4 सुक्या लाल मिरच्या, एक छोटा कांदा, लसूणच्या 2 पाकळ्या, मोहरीचे तेल, कढीपत्ता, मीठ, हिंग घ्या.
सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडे मोहरीचे तेल घाला. आंब्याचे दोन भाग करा, कोय काढून तेलात छान परतून घ्या. त्याचप्रमाणे टोमॅटो आणि कांद्याचे दोन भाग करा आणि तेही पॅनमध्ये घालून तेलात परतून घ्या.
पॅनमध्ये लसूण पाकळ्या आणि लाल मिरच्या घाला. 8-10 कढीपत्ता घाला. आता हे मिश्रण झाकून ठेवा आणि मध्यम आचेवर 5-7 मिनिटे शिजू द्या. थोडा वेळ शिजवल्यानंतर, उलटून दुसऱ्या बाजूनेही शिजू द्या.
यामध्ये थोडेसे मीठ घाला. यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. आता टोमॅटोची साल काढा आणि कैरीचे बारीक तुकडे करा.
आता हे सर्व पदार्थ मिक्सर जारमध्ये घ्या आणि त्यात हिंग घालून छान बारीक वाटून घ्या. चटणी मिक्सरमध्ये फिरवताना मिक्स करत राहा आणि बारीक वाटून घ्या. अशाप्रकारे कच्चा आंबा, टोमॅटो आणि कांद्याची मसालेदार चटणी तयार आहे.
कच्च्या आंब्याची चटणी लवकर खराब होत नाही. तुम्ही ही चटणी तयार करून हवाबंद डब्ब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता. ही चटणी २-३ दिवस सहज टिकू शकते.