वाईट कॉलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर काढायचं? आवर्जून खा ही लसणाची चटणी, जाणून घ्या रेसिपी

Garlic Chutney Recipe: आजकाल कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. लसणाची चटणी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते. कशी बनवायची ही चटणी ते जाणून घेऊयात.

तेजश्री गायकवाड | Updated: May 9, 2025, 02:48 PM IST
वाईट कॉलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर काढायचं? आवर्जून खा ही लसणाची चटणी, जाणून घ्या रेसिपी
How To Make Garlic Chutney For Lower Cholesterol

Garlic Chutney Recipe For Lower Cholesterol and Clean Arteries:  कोलेस्टेरॉल हा एक प्रकारचा चरबीयुक्त पदार्थ आहे, जो शरीरासाठी आवश्यक असतो. पण याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे चांगलं कोलेस्टेरॉल आणि दुसरं वाईट कोलेस्टेरॉल. जर शरीरातील कोलेस्टेरॉल ची पातळी वाढली तर हृदयरोग, स्ट्रोक आणि हाय ब्लडप्रेशर सारख्या समस्या होऊ शकतात. आजकलच्या लाईफस्टाईल मुळे कोलेस्टेरॉल वाढीचं प्रमाण वाढलं आहे. अशात  कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी आहारात सुधारणा करणे खूप महत्वाचे आहे. आहारात लसूण समाविष्ट केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. याशिवाय या चटणीचे अजून वेगवेगळे फायदे आहेत. चला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त अशा लसूण चटणी रेसिपी जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

 लसूण १०-१२ पाकळ्या 
१ चमचा जिरे 
२ हिरव्या मिरच्या (तिखटपणा जास्त हवा असल्यास) 
१ चमचा लिंबाचा रस 
१ चिमूटभर सैंधव मीठ
 २ चमचे चिरलेली ताजी कोथिंबीर 

कशी करायची चटणी?  

लसूण पाकळ्या सोलून स्वच्छ करा.
आता लसूण, हिरवी मिरची, जिरे, मीठ आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घ्या
 या मिश्राणात लिंबाचा रस घालून जाड चटणी तयार करा. 
चटणी हवाबंद डब्यात ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

 'या' गोष्टी लक्षात ठेवा

जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. 
गर्भवती महिला आणि कमी ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच चटणी खावी.  
जर कोलेस्टेरॉल वाढले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून कोणताही उपचार करू नये.

Tags: