How to Make Gujarati Dal Bhat: गुजराती जेवण म्हटलं की पहिलं नाव आठवतं ते म्हणजे डाळ-भात. साधेपणा, पोषणमूल्य आणि चव यांचा परिपूर्ण संगम म्हणजे गुजराती डाळ-भात. ही डाळ चवीला आंबटगोड चव असलेली असते. गरम-गरम भातासोबत ती आणखीनच टेस्टी लागते. ही साधी डिश तुमचं मन आणि पोट दोन्ही भरेल. घरच्या घरी सहज असणारं साहित्य वापरून ही पारंपरिक रेसिपी अगदी झटपट बनवता येते. जर तुम्ही जेवण्यासाठी एखाद्या हलक्या पण टेस्टी जेवणाच्या शोधात असाल, तर ही गुजराती डाळ-भात रेसिपी नक्कीच ट्राय करा.
डाळसाठी:
तूर डाळ – ½ कप
पाणी – 2½ ते 3 कप (डाळ शिजवण्यासाठी)
टोमॅटो – 1 मध्यम (चिरून)
हिरवी मिरची – 1 (चिरलेली किंवा चिरून फोडलेली)
आले – 1 टीस्पून (खवलेले किंवा पेस्ट)
हळद – ¼ टीस्पून
तिखट – ½ टीस्पून
धणे-जिरे पूड – ½ टीस्पून
गूळ – 1 टीस्पून (चवीनुसार)
लिंबाचा रस – 1 टेबलस्पून (चवीनुसार)
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – सजावटीसाठी
फोडणीसाठी:
तूप किंवा तेल – 1½ टेबलस्पून
मोहरी – ½ टीस्पून
जिरे – ½ टीस्पून
हिंग – एक चिमूट
कढीपत्ता – 6-8 पाने
सुकी लाल मिरची – 1 (तुकडे करून)
लवंग – 2
दालचिनी – ½ इंच (ऐच्छिक)
भातासाठी:
बासमती किंवा साधा तांदूळ – 1 कप
पाणी – 2 कप
मीठ – चवीनुसार
तूर डाळ स्वच्छ धुऊन घ्या. 2½ ते 3 कप पाण्यात कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
कुकर थंड झाल्यावर डाळ मॅश करा (गुळगुळीत होईपर्यंत).
एका पातेल्यात मॅश केलेली डाळ घ्या. त्यात टोमॅटो, मिरची, आले, हळद, तिखट, धणे-जिरे पूड, गूळ, मीठ आणि आवश्यक असल्यास पाणी घालून 8-10 मिनिटे उकळा.
दुसऱ्या छोट्या पातेल्यात तूप/तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लाल मिरची, लवंग आणि दालचिनी घाला.
ही फोडणी डाळीत घाला आणि 2 मिनिटे हलके उकळा.
डाळीत लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
तांदूळ धुऊन 15 मिनिटे भिजवून ठेवा. नंतर 2 कप पाणी व मीठ घालून कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत किंवा भांड्यात झाकण ठेवून शिजवा.
गरम गरम भातावर थोडे तूप घालून त्यासोबत ही आंबटगोड गुजराती डाळ सर्व्ह करा. बरोबर लोणचं, पापड असेल तर अजूनच मजा येईल.
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
16/1(9 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.