How to Make Mumbai-style Paneer Frankie: पावसाळ्यात किंवा एखाद्या खास संध्याकाळी काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली, की मुंबईच्या रस्त्यांवर मिळणाऱ्या झणझणीत फ्रँकीची आठवण हमखास डोळ्यासमोर येते. पनीर फ्रँकी हा एक असा प्रकार आहे जो टेस्ट आणि पोषण यांचा परफेक्ट बॅलन्स ठेवतो. या फ्रँकीमध्ये मऊसर पोळी, मसालेदार पनीरचं स्टफिंग, झणझणीत चटण्या आणि वरून लिंबामिठाच्या कांद्याचा भरपूर तडका असतो. ही रेसिपी घरी बनवायला खूप सोपी असून तुम्ही ती नाश्त्यासाठी, डब्यात किंवा अगदी पार्टीत सुद्धा सर्व्ह करू शकता. चला तर मग, जाणून घेऊया ही चविष्ट मुंबई-स्टाईल पनीर फ्रँकी कशी बनवायची ते...
मैदा – १ कप
गव्हाचे पीठ – ½ कप
मीठ – ½ टीस्पून
तेल – १ टेबलस्पून
गरम पाणी – लागेल तितके (मळण्यासाठी)
पनीर स्टफिंगसाठी लागणारे साहित्य
पनीर – २०० ग्रॅम (स्मॉल क्यूब्समध्ये कापलेले)
कांदा – १ मध्यम (स्लाइस केलेला)
सिमला मिरची – ½ कप (स्लाइस केलेली)
आलं-लसूण पेस्ट – १ टीस्पून
टोमॅटो सॉस – १ टेबलस्पून
गरम मसाला – ½ टीस्पून
तिखट – ½ टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
लिंबाचा रस – १ टीस्पून
तेल – १ टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
हिरवी चटणी (कोथिंबीर-पुदिना)
स्वीट चटणी किंवा टोमॅटो केचप
कांदा – बारीक चिरून (थोडा लिंबाचा रस व चाट मसाला टाकून)
चाट मसाला – वरून भुरभुरण्यासाठी
मैदा, गव्हाचे पीठ, मीठ व तेल एकत्र करून त्यात थोडे थोडे गरम पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या.
१५-२० मिनिटे झाकून ठेवा, नंतर लाटून पोळ्या तव्यावर शेकून घ्या. (हलकं तेल लावल्यास चांगलं कुरकुरीत लागतं.)
कढईत तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट परता.
कांदा व सिमला मिरची घालून थोडं परता.
त्यात हळद, तिखट, गरम मसाला, मीठ घाला.
नंतर पनीरचे तुकडे घालून २-३ मिनिटं परता.
टोमॅटो सॉस व लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा. स्टफिंग तयार आहे.
शेकलेली पोळी घेऊन त्यावर हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस थोडी पसरवा.
त्यावर गरम पनीर स्टफिंग ठेवा.
त्यावर कांद्याचे स्लाइस व थोडासा चाट मसाला भुरभुरवा.
पोळी दोन्ही बाजूंनी गुंडाळून रोल करा.
तयार फ्रँकी गरम गरम टोमॅटो केचप किंवा दहीसोबत सर्व्ह करा.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
MI
(20 ov) 195/6
|
VS |
PBKS
198/3(16.3 ov)
|
| Punjab Kings beat Mumbai Indians by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 146
|
VS |
RCB
149/5(15.1 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Lucknow Super Giants by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.