चहा बनवताना आधी पाणी, दूध की आलं? International Tea Day निमित्ताने जाणून घ्या परफेक्ट टेस्टसाठी Recipe

International Tea Day, Tea Recipe: 21 मे हा जागतिक चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. अशात आज आम्ही तुमच्यासाठी सगळ्यात टेस्टी आणि परफेक्ट चहा कसे बनवायचा हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात चहाची रेसिपी...   

तेजश्री गायकवाड | Updated: May 21, 2025, 11:37 AM IST
चहा बनवताना आधी पाणी, दूध की आलं? International Tea Day निमित्ताने जाणून घ्या परफेक्ट टेस्टसाठी Recipe
How to Make Perfect Tea adrak chai recipe

How to make perfect tea know recipe: 21 मे हा दिवस ‘इंटरनॅशनल टी डे’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. चहा हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अत्यंत लोकप्रिय पेय मानलं जातं.  अनेक भारतीयांची सकाळ चहाशिवाय होऊच शकत नाही.अनेकजण दिवसातून अनेकवेळा चहा पितात. मात्र, चहा रोज पिणाऱ्यांपैकी अनेकांना चहा बनवण्याची योग्य पद्धत माहितच नसते. चहा बनवताना अनेकदा प्रश्न पडतो की, अद्रक आधी टाकायचं की दूध?. चहा बनवण्याची पद्धत फक्त चवच नाही, तर आरोग्यावरही परिणाम करत असते. त्यामुळे आजच्या या खास दिवशी आपण जाणून घेऊयात चहा बनवण्याचा एक योग्य क्रम,चला जाणून घेऊयात परफेक्ट  चहाची रेसिपी.... 

अद्रक कधी टाकायचं?

पाण्यात आधी अद्रक टाका. आधी पाण्यात अद्रक टाकल्याने त्याचे औषधी गुणधर्म पाण्यात उतरतात. त्यामुळे चहा फक्त चवीलाच नव्हे, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. या उलट, दूध आधी टाकून मग अद्रक टाकल्यास दूध फाटण्याची शक्यता असते, आणि चहा कडवट होतो.

हे ही वाचा: नाश्त्यासाठी बनवा सोपं, पौष्टिक आणि झटपट तयार होणारं मूग डाळीचं धिरडे, जाणून घ्या Healthy Breakfast Recipe

 

दूध शेवटी का टाकायचं?

दूध जास्त वेळ उकळलं की चहा वगेलाच टेस्ट करतो. यामुळे चहा जड आणि कधीकधी बेस्वाद बनतो. त्यामुळे चहात नेहमी शेवटीच दूध घालून उकळावं. 

हे ही वाचा: नाश्त्यासाठी बनवा दही-पोहे, उन्हाळ्यात पोटाला देईल थंडावा, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe

 

चला जाणून घेऊयात कसा बनवायचा बेस्ट चहा

  • एका पातेल्यात आवश्यतेनुसार पाणी टाका आणि उकळायला ठेवा.
  • पाणी गरम झालं की त्यात किसलेलं किंवा ठेचलेलं अद्रक टाका. अद्रकाचा झणझणीत स्वाद या उकळत्या पाण्यात मुरतो.
  • त्यातच चहाची पत्तीही घालून कमीत कमी 4 मिनिटं उकळा.
  • उकळून आलं की त्यात दूध आणि साखर घाला. आता पुन्हा 4-5 मिनिटं मस्त उकळा.
  • गॅस बंद करा, चहा गाळा आणि कपात ओता. गरमागरम परफेक्ट चहा रेडी आहे.