How to Make Rava Upma Breakfast Recipe : सकाळच्या धावपळीत काहीतरी झटपट, चविष्ट आणि पोटभर खाणं गरजेचं असतं. नाश्ता केला की दिवसभराची धावपळ करायला ऊर्जा मिळते. अशा वेळी नाश्त्यात काय खावं हे समजत नाही. यासाठी आज आम्ही नाश्त्याची एक सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी रवा उपमा ही एक परफेक्ट रेसिपी ठरते. कारण रवा उपमा हा कमी वेळेत तयार होणारा, घरात सहज उपलब्ध साहित्याने बनवला जाणारा पौष्टिक नाश्ता आहे. हा उपमा लहान ते मोठे सगळेच खाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात सोपी रेसिपी...
रवा – 1 कप
तेल – 2 टेबलस्पून
मोहरी – 1/2 टीस्पून
उडीद डाळ – 1 टीस्पून
चणाडाळ – 1 टीस्पून
हिंग – चिमूटभर
कढीपत्ता – 8-10 पाने
हिरवी मिरची – 2 (बारीक चिरून)
कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
आले – 1 टीस्पून (बारीक चिरलेले किंवा किसलेले)
हे ही वाचा: नाश्त्यासाठी बनवा दही-पोहे, उन्हाळ्यात पोटाला देईल थंडावा, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe
पाणी – 2 ते 2½ कप
मीठ – चवीनुसार
साखर – 1/2 टीस्पून (ऐच्छिक)
कोथिंबीर – 2 टेबलस्पून (गार्निशसाठी)
लिंबाचा रस – 1 टीस्पून (ऐच्छिक)
हे ही वाचा: Recipe: नाश्त्यासाठी बनवा रवा-पोह्यांची सॉफ्ट आणि हेल्दी इडली, झटपट तयार होईल Healthy Breakfast
कढईत रवा कोरडा हलका सोनेरी आणि सुगंध येईपर्यंत भाजून घ्या. भाजलेला रवा बाजूला ठेवा.
नंतर कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, उडीद डाळ, चणाडाळ, हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाका. डाळ थोडीशी खरपूस होईपर्यंत परता.
आता त्यात आले व कांदा घालून छान परतून घ्या.
परतून झाल्यावर 2 ते 2½ कप पाणी कढईत घाला. त्यात मीठ आणि साखर (हवी असल्यास) घालून पाणी उकळू द्या.
पाणी उकळायला लागल्यावर भाजलेला रवा थोडा थोडा करत घाला व सारखे हलवत राहा, लक्षात घ्या गुठळ्या होऊ देऊ नका.
गॅस कमी करा, झाकण ठेवा आणि 3-4 मिनिटं वाफ येऊ द्या. रवा मऊ होईपर्यंत शिजवा.
हे ही वाचा: मसाला ते भुर्जी स्टाइल... रविवारी नाश्त्यासाठी ट्राय करा हे वेगेवेगळे ऑम्लेट! नोट करा सोपी Omelette Recipe
शेवटी वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.
गरमागरम उपमा नारळाच्या चटणीसोबत किंवा चहा बरोबर सर्व्ह करा.