मुलांचं संगोपन करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने मुलांवर संस्कार केले जातात, त्यांना सांभाळलं जातं. मात्र भारतीय पॅरेंटिंग पद्धत ही अतिशय प्रभावशाली आहे. अशावेळी भारतीय पालकांच्या टिप्स नक्की फॉलो करा. भारतात मुलांचे अगदी प्रेमाने आणि आपुलकीने लालन-पालन केले जाते. अशावेळी काही ठराविक गोष्टी केल्या जातात. त्या गोष्टी कोणत्या ते समजून घेणे गरजेचे असते. 


पालकच पहिले शिक्षक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय पॅरेंटिंग टिप्समध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका पालक म्हणजे आई-बाबा निभावतात. पालक मुलांना रोजच्या दिनक्रमात मदत करतात. मुलांच्या संगोपनात पालकांचं योगदान महत्त्वाचं असतं. लहानपणापासून पालक मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. जसे की, मुलांना संस्कार देणे, अभ्यास घेणे, रोजच्या गोष्टी शिकवणे तसेच महत्त्वाचे विचर, सवयी या पालकच शिकवतात. 


हर्बल नुस्खे 


भारतात घरगुती आणि हर्बल उपचारांची कमतरता जाणवणार नाही. येथे प्रत्येक आजारावर हळदीच्या दुधाने उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात औषधांचा खजिना आहे. तुमचा आजार बरा करण्यासाठी वयाने जुने घरगुती उपाय तयार आहेत. जेव्हा मुलाला थोडासा खोकला आणि सर्दी होते, तेव्हा आईने लगेच त्याला काढा करुन देते. यामुळे मुलांना लहानपणापासूनच सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही घरीच मिळत असतात. हा संस्कार मुलांवर लहानपणापासूनच होतो. 


अभ्यासात हुशार 


भारतात पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप मदत करतात. करिअरमध्ये कोणता विषय निवडायचा आणि त्यांना काय बनायचे आहे हे ठरवण्यात पालकही मुलांना मदत करतात. पालक आपल्या मुलाच्या अभ्यासाच्या वेळापत्रकात खूप गुंतलेले असतात. तसेच पालक स्वतः मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देतात. मग ते शाळेचे गॅदरिंग असो किंवा इतर राही ऍक्टिविटी. 


प्रेमाने खाऊ घालणं 


भारताला खाद्य संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. अशामध्ये मुलांना पोटभर खाऊ घालणे हा पालकांचा प्रेमाचा विषय असतो. भारतातील आईचे प्रेम असे आहे की, त्या आपल्या मुलांना उपाशी राहू देत नाहीत आणि लाड करून त्यांना जास्तीत जास्त खायला देण्याचा प्रयत्न करतात. भारतात जेवण प्रेमाने बनवले जाते. त्यामुळे  भारतात पाकसंस्कृतीला देखील तितकंच महत्तव आहे. 


मॅचमेकिंगमध्ये माहिर 


मुलांसाठी जोडीदार निवडण्याचं काम देखील पालक करतात. काटेकोरपणे मुलांसाठी जोडीदार निवडला जातो. महत्त्वाचं म्हणजे मुलं देखील आपल्या पालकांचीनिवड प्रेमाने स्वीकारतात. लहानपणापासूनच मुलांवर लग्न संस्कृतीसे महत्त्व पटवून दिले जाते. अशा