How to make South Indian Style Sambhar at home : दक्षिण भारतीय जेवण म्हटलं की सर्वात आधी आठवण येते ती सांभाराची! पण आज आपण बनवणार आहोत तीखा-खट्टा सांभर, ज्यात तिखटपणा आणि आंबटपणाचा परफेक्ट बॅलन्स आहे. गरमागरम भात, इडली, डोसा किंवा वड्यासोबत हा सांभार खाल तर जेवणाची चव दुप्पट होते. साध्या मसाल्यांमध्ये आणि घरच्या चवीत तयार होणारा हा सांभर बनवायला अगदी सोपा, पण चवेला एकदम जबरदस्त! चला तर मग शिकूया ही खास रेसिपी…
तुरीची डाळ धुवून कुकरमध्ये घ्या.
त्यात हळद आणि पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत मऊ शिजवा.
शिजल्यानंतर डाळ छान गाठी न राहता फेटून घ्या.
एका भांड्यात सर्व चिरलेल्या भाज्या व थोडे मीठ घालून मऊ होईपर्यंत उकळा.
त्यात टोमॅटो आणि चिंचेचे पाणी घाला.
5-7 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.
आता उकळत असलेल्या भाज्यांमध्ये शिजवलेली डाळ घालावी.
त्यात सांभर मसाला, लाल तिखट, मीठ आणि गूळ घाला.
मिश्रण 7-8 मिनिटे मंद आचेवर छान फोडू द्या जेणेकरुन चव एकजीव होईल.
कढईत तेल गरम करा.
त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालून फोडणी करून घ्या.
ही फोडणी सांभारावर ओता आणि हलकेच ढवळा.
सांभर 2 मिनिटे झाकून दमात ठेवा.
सुगंध अप्रतिम येईल!
गरमागरम भात, इडली, डोसा, वडा किंवा उत्तप्पा सोबत सर्व्ह करा.
वरून थोडी कोथिंबीर घातली तर चव दुप्पट लागते.
आंबटपणा जास्त हवा असेल तर चिंच थोडी वाढवा.
तिखटपणा वाढवण्यासाठी लाल तिखट + थोडा सांभर मसाला वाढवू शकता.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.