Idli Recipe: घरी कशी बनवायची परफेक्ट सॉफ्ट आणि स्पंजी इडली? जाणून घ्या सोपी रेसिपी

 Idli Recipe in Marathi:  इडली बनवायला सोपी असली तरी ती अनेकदा फसते. यासाठी परफेक्ट सॉफ्ट आणि स्पंजी इडली कशी बनवायची हे जाणून घ्या.   

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 11, 2025, 07:57 AM IST
Idli Recipe: घरी कशी बनवायची परफेक्ट सॉफ्ट आणि स्पंजी इडली? जाणून घ्या सोपी रेसिपी
Kitchen Recipe in Marathi How To Make Idli At Home

How To Make Idli At Home: इडली ही दक्षिण भारतीय पाककृती असली तरी आज ती संपूर्ण भारतात अत्यंत लोकप्रिय झाली आहे. नाश्ता असो, टिफिन असो किंवा हलका संध्याकाळचा आहार  इडली नेहमीच आरोग्यदायी पर्याय ठरते. तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवलेली इडली तेलकट नसते, पचायला हलकी असते आणि शरीराला उर्जा देणारीही असते. विशेष म्हणजे, ती मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी योग्य आहे. इडलीसोबत नारळाची चटणी, सांबार किंवा तुपाचा एक चमचा दिला, तर तिचा स्वाद दुप्पट वाढतो. अनेकजण आज इडलीला वजन नियंत्रण आणि फिटनेस डाएटसाठीही पसंती देतात. पारंपरिक पद्धतीने भिजवून, आंबवून बनवलेली इडली जितकी सॉफ्ट आणि स्पंजी असते, तितकीच रुचकरही असते. चला तर पाहूया घरच्या घरी इडली कशी बनवायची.

Add Zee News as a Preferred Source

लागणारे साहित्य:

तांदूळ – 2 कप

उडीद डाळ – 1 कप

मेथीदाणे – ½ टीस्पून

मीठ – चवीनुसार

पाणी – आवश्यकतेनुसार

कशी बनवायची परफेक्ट सॉफ्ट आणि स्पंजी इडली?

तांदूळ, उडीद डाळ आणि मेथीदाणे वेगवेगळे धुऊन 6-8 तास भिजवून ठेवा.

भिजल्यानंतर दोन्ही एकत्र बारीक वाटून घ्या.

मिश्रण थोडं घट्ट ठेवून रात्रभर आंबवण्यासाठी झाकून ठेवा.

सकाळी त्यात मीठ घाला आणि नीट ढवळा.

इडलीच्या साच्यात तेल लावून मिश्रण ओता.

स्टीमरमध्ये 10-12 मिनिटं वाफवून घ्या.

गरमागरम इडली सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More