)
How To Make Mumbai style Veg Frankie Roll At Home: फास्ट फूड म्हटलं की सर्वात आधी आठवण येते ती मुंबईची खासियत व्हेज फ्रँकी रोल. गरमागरम पराठ्यात भरलेली चटकदार मसालेदार भाजी, त्यावर हिरवी चटणी, सॉस आणि कांद्याची लेअर... असा हा रोल झटपट खायला सोपा आणि पोटभर जेवणासारखा लागतो. मुलांच्या डब्यासाठी असो, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा प्रवासात झटपट खाण्यासाठी बॉम्बे व्हेज फ्रँकी रोल ही नेहमीच हिट रेसिपी आहे. चला याची रेसिपी जाणून घेऊयात.
मैदा – 1 कप
गव्हाचे पीठ – ½ कप
मीठ – चवीनुसार
तेल – 1 टेबलस्पून
पाणी – मळण्यासाठी
उकडलेले बटाटे – 2-3 मध्यम आकाराचे
गाजर किसलेले – ½ कप
कोबी किसलेला – ½ कप
ढोबळी मिरची (कापलेली) – ½ कप
कांदा – 1 (पातळ कापलेला)
आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
गरम मसाला – ½ टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल – 2 टेबलस्पून
सॉस आणि टॉपिंगसाठी
हिरवी चटणी – 2 टेबलस्पून
टोमॅटो सॉस – 2 टेबलस्पून
मेयोनीज (ऐच्छिक) – 2 टेबलस्पून
कांदा पातळ कापलेला – 1
चाट मसाला – थोडा
मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल एकत्र करून पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या.
15 मिनिटं झाकून ठेवून द्या.
छोट्या गोळ्या करून पातळ पराठे लाटून तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्या.
कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा परता.
गाजर, कोबी, ढोबळी मिरची घालून थोडं परतून घ्या.
उकडलेले बटाटे मॅश करून त्यात घाला.
लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ घालून चांगलं मिसळा.
भाजी तयार झाल्यावर थंड होऊ द्या.
शेकलेला पराठा घ्या. त्यावर हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज पसरवा.
मधोमध भाजीचे भरण ठेवा.
त्यावर कांदा काप आणि चाट मसाला शिंपडा.
रोल करून गरमागरम सर्व्ह करा.
हवे असल्यास रोल शेकताना अंड्याचा कोट लावून शेकू शकता (एग फ्रँकीसारखा).
भरण्यात पनीरचे तुकडे, कॉर्न किंवा मशरूम घालून अधिक टेस्टी बनवता येईल.
चटणी थोडी तिखटसर ठेवली तर फ्रँकीचा खरा बॉम्बे-स्टाईल स्वाद येतो.