)
How To Make Oats Moong Dal Tikki At Home: आजकाल हेल्दी खाण्याच्या जमाना आहे. सगळेच लोक फिटनेसकडे वळले आहेत. याशिवाय धावपळीच्या जीवनात टेस्ट आणि हेल्थ या दोघांचा मेळ घालणं फार महत्त्वाचं आहे. नाश्ता करणे हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. कारण नाश्त्याने आपल्या दिवसाची सुरुवात होते. त्यामुळे हा नाश्ता हेल्दी असणे गरजेचे आहे. याचसाठी आम्ही आज एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ओट्स–मूगदाळ टिक्की ही अशीच एक पौष्टिक, हलकी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. ओट्स–मूगदाळ टिक्की बनवणे फारच सोप्पे आणि कमी वेळेत होणारी आहे. प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक घटकांनी भरलेली ही टिक्की वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळ- संध्याकाळच्या हेल्दी स्नॅकसाठी उत्तम पर्याय ठरते. कमी तेलात बनणारी आणि सहज तयार होणारी ही रेसिपी नक्कीच सर्वांना आवडेल.
चला ओट्स आणि मूगडाळीच्या टिक्कीची रेसिपी जाणून घेऊयात...
भिजवलेली मूगदाळ पाणी न घालता जाडसर वाटून घ्या.
ओट्स कोरड्या कढईत हलके भाजून मिक्सरमध्ये जाडसर पूड करून घ्या.
एका भांड्यात वाटलेली मूगदाळ, ओट्सची पूड, कांदा, हिरवी मिरची, आले–लसूण पेस्ट आणि सर्व मसाले घाला.
कोथिंबीर घालून सगळं मिश्रण नीट एकजीव करा. गरज वाटल्यास थोडं पाणी घाला.
मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून टिक्कीप्रमाणे चपटे करा.
नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल घालून टिक्क्या दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
हिरव्या चटणीसोबत
दही किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत
संध्याकाळच्या हेल्दी स्नॅकसाठी उत्तम
वजन कमी करण्यासाठी टिक्की कमी तेलात किंवा एअर फ्रायरमध्येही करता येतात.