होळीचा रंग करू शकतो आरोग्य बेरंग, 'असा' ओळखा असली आणि नकली गुलाल!

Holi Fake Color Awareness: रंगांच्या होळीचा दिवस लवकरच येणार आहे. अशात होळी आली की बाजारात भेसळयुक्त, केमिकलयुक्त रंगांच्या विक्रीचेही प्रमाण वाढते. ज्यांचा वापर केल्यास त्वचेवरच नाही तर, आरोग्यावर देखील परिणाम होतो. अशावेळी शुद्ध आणि भेसळयुक्त रंगांमधील फरक कसा ओळखायचा हे जाणून घ्या.   

मनाली सागवेकर | Updated: Feb 28, 2026, 06:20 PM IST
होळीचा रंग करू शकतो आरोग्य बेरंग, 'असा' ओळखा असली आणि नकली गुलाल!
Photo Source: Freepik

How To Find Out Fake Gulal: होळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक आणि बनावट रंगांची मोठी आवक झाली आहे. केमिकल युक्त हे गडद रंग दिसायला आकर्षक असले तरी ते तिथकेच घातक ही आहेत. या रंगात शिसे (Lead), पारा, क्रोमियम आणि काचेचे बारीक कण मिसळलेले असतात. हे घटक केवळ त्वचेसाठीच नव्हे, तर डोळे आणि केसांसाठीही अत्यंत घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा रंगापासून दुर राहा. नाही तर रंगाचा बेरंग होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे खरा आणि खोटा रंग कसा ओळखावा? वाईट गुणवत्तेच्या रंगांपासून त्वचेला होणारा त्रास रोखण्यासाटी काय करावे? हे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सदानंद नायक यांच्याकडून जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

 

अशी करा अस्सल गुलालाची ओळख

1. वासावरून ओळखा: नैसर्गिक किंवा सेंद्रिय गुलालचा वास अत्यंत सौम्य आणि फुलांसारखा असतो. जर गुलालातून पेट्रोल, रॉकेल किंवा तीव्र रासायनिक वास येत असेल, तर तो भेसळयुक्त समजावा. 

2. पाण्यात विरघळून पहा: थोडासा गुलाल पाण्यात टाका. जर तो पूर्णपणे विरघळला आणि तळाला काहीही उरले नाही, तर तो सुरक्षित असू शकतो. मात्र, काही कण तरंगत राहिल्यास तो वापरणे टाळा. 

 

3. स्पर्श करून पहा: अस्सल गुलाल हातावर चोळल्यास तो मऊ आणि बारीक लागतो. जर तो खरखरीत किंवा त्यात चमकणारे कण दिसले, तर तो काचेची पूड असलेला असू शकतो. 

 

होळी खेळण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची ?

डॉ. डॉ. सदानंद नायक यांनी सांगितल्या प्रमाणे, त्वचेचे संरक्षण करण्यासाठी होळी खेळण्यापूर्वी अंगाला खोबरेल किंवा मोहरीचे तेल लावावे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी कॉन्टॅक्ट लेन्स टाळून चष्मा वापरावा. तसेच, पूर्ण बाह्यांचे कपडे घातल्यास रंगाचा थेट संपर्क टाळता येतो. रंग काढताना त्वचा जोरात न घासता बेसन, दही किंवा तेलाचा वापर करावा. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. कारण सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात भेसळ युक्त रंग विकण्यास आले आहेत. त्यात केमिकलचा वापर ही भरमसाट करण्यात आला आहे. त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे

 

होळीच्या दिवशी आरोग्यासाठी करा 'हे' उपाय

आरोग्यदायी होळीसाठी काही नियम नक्कीच आहेत. ते प्रत्येकाने फॉलो करणे गरजेचे आहेत. होळी खेळताना पूर्ण कपडे घाला जेणेकरून शरीराचा कमीत कमी भाग उघडा राहील. केसांच्या संरक्षणासाठी तेल लावून बांधून ठेवा. रंग काढण्यासाठी त्वचा जोरात चोळू नका, त्याऐवजी बेसन आणि दह्याचे मिश्रण वापरा. पॅकेटवर घटक (Ingredients) तपासूनच खरेदी करा. नैसर्गिक रंग वापरून तुमची आणि तुमच्या प्रियजनांची होळी सुरक्षित आणि आनंददायी करा.

About the Author

Manali Sagvekar

सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.

...Read More