Know How To Talk With Girls: 'मुली माझ्याशी बोलणे का टाळतात?', 'मुली माझ्याशी बोलताना नेहमी का घाबरतात?', 'इंतरांसारखी कोणती मुलगी माझ्याशी सहज मैत्री का करत नाही?' असे अनेक प्रश्न बऱ्याच मुलांच्या मनात गिरट्या घालत असतात. यामुळे वय ओलांडून गेले असेल तरी काही मुले एकटीच राहत त्यांना जोडीदार मिळत नाही. किंवा जोडीदार मिळाला तरी ते नाते जास्त काळ टिकत नाही. अनेक मुलांकडे परफेक्ट पर्सनॅलिटी असून सुद्धा त्यांच्या मैत्रिणी नसतात किंवा ते सिंगलच राहतात. यामागचे कारण असे की, फक्त चांगली पर्सनॅलिटी आणि चांगले काम करणे पुरेसे नाही. तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी योग्य पद्धतीने संवाद साधता येणेही महत्त्वाचे आहे. आकर्षक बोलण्याचे तंत्र शिकायचे असतील आणि मुलींमध्ये तुमच्याबाबत आकर्षण निर्माण व्हावे असे वाटत असेल तर, ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
तुम्ही बऱ्याचदा निरीक्षण केले असेल की, तुमच्या एका मित्राकडे ना पर्सनॅलिटी आहे, ना चांगले काम पण तरी सुद्धा मुली त्याच्याशी दिलखुलासपणे बोलत असतात. त्याच्या अनेक मैत्रिणीही असतात. कारण त्याच्याकडे पर्सनॅलिटी किंवा कामात ओळख नसली तरी मुलींशी कसे बोलायचे?, कसे वागायचे? हे त्याला चांगलेच माहित आहे. मुलींशी बोलताना खाली दिलेल्या चुका टाळल्या तर तुम्हीही मुलींसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनू शकता.
1. त्यांच्या समस्यांना किरकोळ समजू नका
मुलींना लहानात लहान समस्याही मोठ्या वाटत असतात. त्यांना त्यांच्या समस्या शेअर करायला आवडतात मग त्या कितीही लहान असो. जर एखादी मुलगी तुमच्या जवळ कोणतीही समस्या मांडत असेल तर तिचे बोलणे तितक्याच गांभीर्याने ऐका. यामुळे तुम्हाला तिच्या भावना समजत आहेत आणि तुम्ही ते मनापासून ऐकत आहात असे वाटते. ज्यामुळे मुलींना तुमच्याबद्दल आदर आणि विश्वासाची भावना निर्माण होईल.
2. मुलींच्या बोलण्यात सतत लॉजिक शोधू नका
मुले नेहमी प्रॅक्टिकल विचार करतात याउलट मुली भावनांना महत्त्व देतात. मुलींना कोणत्याही गोष्टींवर बोलण्याची सवय असते. त्यांना अर्थ नसलेले प्रश्न विचारायला फार आवडते. खरं तर हे त्यांच्या स्वभावातच असते. तुम्हाला एखादी मुलगी कोणत्याही विषयाबद्दल सांगत असेल तर ते शांततेत, जास्त विचार न करता फक्त ऐकून घ्या. तुमची मैत्रिण तुम्हाला एखादा तथ्य नसलेला प्रश्न विचारत असेल तरी न वैतागता शांततेत उत्तर द्या.
3. मुलींची सतत टिंगल करू नका
बऱ्याच मुलांना मुलींना सतत चिडवायची, त्यांची खिल्ली उडवण्याची सवय असते. असे करणे टाळा. असे केल्याने तुम्हाला मुलींबद्दल आदर नाही असे वाटते. यामुळेही मुली तुमच्याशी बोलणे टाळू शकतात.
4. तिच्या भावना समजून घ्या
तुमच्या मैत्रिणीच्या वागण्याचे निरीक्षण करा. तिचे वागणे, बोलणे रोजच्यापेक्षा थंडावलेले वाटत असेल तर लगेचच तिची विचारपूस करा. तिच्या भावना जाणून घ्या. तिला असलेल्या अडचणींबाबत चर्चा करा. यामुळे तुम्ही तिच्या भावनांना महत्त्व देत आहात असा विश्वास निर्माण होईल. तुमच्यातील मैत्री आणखीन घट्ट होईल.
5. तिला नेहमी प्रोत्साहन द्या
मुलींना लहान लहान गोष्टींवरून त्यांचे कौतुक केलेले फार आवडते. तुमची मैत्रिण तुम्हाला तिने केलेल्या कामाबद्दल सांगत असेल तर तिला प्रोत्साहन द्या. तिचे काही चुकले असेल तर तिच्यावर न हसता तिला शांततेत समजवा. यामुळे तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण होईल.
सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.
...Read More|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
CAN
156/8(20 ov)
|
| South Africa beat Canada by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(19.5 ov) 103
|
VS |
ZIM
106/2(13.3 ov)
|
| Zimbabwe beat Oman by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(20 ov) 207/4
|
VS |
ITA
134(16.4 ov)
|
| Scotland beat Italy by 73 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.