घरच्या घरी कुकरमध्ये बनवा सोपा ओट्स आणि केळीचा चॉकलेट चिप केक

लहान मूलांना केक तर खूपचं आवडतो. परंतु त्यात मैद्याचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांच्या आरोग्यास धोकादायक ठरु शकतो. जास्त प्रमाणात मैद्याचे सेवन हे आपल्या पोटातील आतड्यांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे केक खाण्यापासून पालक त्यांना थांबवतात. 

Intern | Updated: Jan 18, 2025, 05:25 PM IST
घरच्या घरी कुकरमध्ये बनवा सोपा ओट्स आणि केळीचा चॉकलेट चिप केक

ओट्स आणि केळीपासून बनवलेला हा केक लहान मुलांना आवडेलचं आणि तो आरोग्यासाठी फायदेशीर ही ठरु शकतो.  या केकची कृती खूपचं सोपी आहे. पाहूयात ओट्स आणि केळीपासून बनवलेला चॉकलेट चिप केक कसा बनवायचा. 

केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
1 कप ओट्सचे पिठ  
2 पिकलेले केळी 
1/2 कप गोड दही  
1/2 कप तूप किंवा तेल  
1/4 कप दूध  
1 चमचा बेकिंग पावडर  
1/2 चमचा बेकिंग सोडा  
1/2 चमचा दालचिनी पावडर (आवडीनुसार)  
1/2 कप चॉकलेट चिप्स  
1/2 कप गूळ किंवा साखर (स्वादानुसार)  
1 चमचा व्हॅनिला एक्सट्रॅक्ट  
चिमूटभर मीठ  

सुरवातीला कूकरच्या आत एक स्टॅंड ठेवा, ज्यामुळे केक बेक करताना टिन कूकरच्या तळाशी थेट लागणार नाही. कूकरमध्ये अर्धा कप पाणी ओता, जेणेकरून स्टीम तयार होईल. कूकर लावल्यावर त्याचा झाकण न लावता, झाकण ठेवून 10-15 मिनिटे तसाच तापत राहू द्या.

एका मोठ्या भांड्यात पिकलेली केळी घ्या आणि त्याला दाबून घ्या. त्यात गूळ किंवा साखर, दही, तूप किंवा तेल आणि दूध घाला. व्हॅनिला एक्सट्रॅक्ट देखील घाला. हे सर्व घटक चांगले मिक्स करा. त्यानंतर एक वेगळे भांडे घ्या आणि त्यात ओट्स पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर आणि चिमूटभर मीठ घाला. चांगले मिक्स करा. ओट्सच्या मिश्रणात कुचकरलेली केलेली केळी घालून, सर्व घटक एकत्र करा. आता चॉकलेट चिप्स घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. केक बेक करण्यासाठी एका 7-8 इंचाच्या बेकिंग टिनला तूप लावा किंवा बटर पेपर घाला. तयार केलेले मिश्रण टिन मध्ये ओता. आता हा टिन कूकरमध्ये ठेवा. कूकरची शिट्टी काढून झाकण लावा. 30-40 मिनिटे केक बेक होईल. वेळ संपल्यानंतर, टूथपिक घालून तपासा. टूथपिक स्वच्छ बाहेर आल्यास, केक तयार आहे. केक कूकरमध्ये बेक झाल्यावर त्याला 5-10 मिनिटे थंड होऊ द्या. नंतर त्याला कापून सर्व्ह करा. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)