होळीसाठी घरच्या घरी बनवा स्पेशल थंडाई - सोपी रेसिपी

होळीचा सण म्हणजे रंगांचा उत्सव असतो आणि या दिवशी गोड पदार्थ आणि थंड पेयांची खासियत असते. होळी साजरी करताना परंपरेनुसार थंडाई बनवली जाते, जी चविष्ट आणि पौष्टिक असते.

Intern | Updated: Mar 11, 2025, 01:51 PM IST
होळीसाठी घरच्या घरी बनवा स्पेशल थंडाई - सोपी रेसिपी

देश-परदेशात होळी सणाची तयारी जोरात सुरू असते. या वर्षी होळी 14 मार्च रोजी आहे आणि होळीला नाश्त्यासोबत काही थंड पेय तयार करायचे असतील, तर तुम्ही ही स्पेशल थंडाई बनवू शकता. तर या सणानिमित्त घरच्या घरी स्पेशल थंडाई तयार करा. चला पाहूयात याची सोपी रेसिपी:

साहित्य:
1 लिटर दूध, 10-12 पिस्ता, 10-12 काजू, 10-12 बदाम, 4-5 गुलाबाच्या पाकळ्या, 3 टेबलस्पून साखर (चवीनुसार), 1/2 टीस्पून वेलची पावडर, 1/2 इंच दालचिनी, 1 टेबलस्पून खरबूजाच्या बिया, 1 टेबलस्पून खसखस, 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर

कृती:
1. सर्वप्रथम, पिस्ता, काजू, बदाम, खरबूजाच्या बिया, खसखस, गुलाबाच्या पाकळ्या, वेलची, दालचिनी आणि काळी मिरी एकत्र करून मिक्सरमध्ये छान बारिक करून घ्या.  
2. नंतर दूध उकळा आणि उकळताना त्यात तयार केलेली पावडर घाला. यामुळे सर्व मसाले दूधात चांगले मिक्स होतात. 
3. दूध उकळून 5-10 मिनिटे मंद आचेवर ठेवून त्याला थोडे घट्ट होऊ द्या. नंतर गॅस बंद करा.
4. पावडर घालण्याच्या वेळेस साखर आणि चवीनुसार वेलची पावडर घालावी. दूध चांगले ढवळून घ्या.
5. थंडाई थोडी थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. 
6. थंडाई चांगली गार झाली की, ग्लासमध्ये ओतून सर्व्ह करा. तुम्ही सजवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या किंवा पिस्ताचे तुकडे वापरू शकता.

विशेष टिप्स:
1.थंडाईमध्ये आलं किंवा केशर देखील घालता येईल, ज्यामुळे त्याची चव अजून वाढते.
2.थंडाई प्यायल्याने पचनास मदत होते आणि शरीराला उर्जा मिळते, त्यामुळे हे थंड पेय शरीरासाठी लाभदायक आहे.

आता तुम्ही तुमच्या होळीला एक खास स्पेशल टच देऊ शकता आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाने थंडाईचा आस्वाद घेऊ शकता.