आतड्यात अडकली मॉइश्चरायझरची बाटली; तरुणीने प्रायव्हेट पार्टमध्ये...डॉक्टरांही हादरले

एका महिलेच्या आतड्यात मॉइश्चरायझरची बाटली अडकली. डॉक्टरकडे गेल्यावर ही घटना कशी घडली हे कळल्यावर त्यांच्याही पायाखालची जमीनच सरकली.     

नेहा चौधरी | Updated: Jul 4, 2025, 10:50 PM IST
आतड्यात अडकली मॉइश्चरायझरची बाटली; तरुणीने प्रायव्हेट पार्टमध्ये...डॉक्टरांही हादरले

डॉक्टरांकडे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण येत असतात. पण एक विचित्र प्रकरण डॉक्टरांकडे आलं. एका 27 वर्षीय तरुणी पोटदुखी आणि दोन दिवसांपासून शोच करू न शकल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात आली. सर गंगा राम रुग्णलायातील आपत्कालीन कक्षात असह्य वेदना घेऊन ती आली. तपासणी करताना तरुणीने डॉक्टरांना सांगितलं की, लैंगिक सुखाच्या इच्छेने तिने दोन दिवसांपूर्वी तिच्या गुदाशयात मॉइश्चरायझरची बाटली घातली होती.

ती तरुणी असह्य वेदना घेऊन पहिले तिच्या जवळच्या रुग्णालयात गेली. जिथे डॉक्टरांनी बाटली काढण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले. त्यानंतर तिच्या पोटाचा एक्स-रे काढण्यात आला, ज्यामध्ये बाटली गुदद्वाराच्या वरच्या भागात अडकलेली आढळून आली. महिलेची गंभीर स्थिती आणि आतडे फुटण्याची शक्यता पाहून तिला रात्री तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.

शस्त्रक्रिया पथकात डॉ. तरुण मित्तल, डॉ. आशिष डे, डॉ. अनमोल आहुजा, डॉ. श्रेयश मांगलिक आणि भूलतज्ज्ञ डॉ. प्रशांत अग्रवाल यांचा समावेश होता. सिग्मोइडोस्कोपीच्या मदतीने बाटली यशस्वीरित्या काढण्यात आली. या प्रक्रियेत पोट किंवा आतडे कापण्याची आवश्यकता नव्हती, ज्यामुळे रुग्णाला कमी वेदना आणि जलद बरे होण्यास मदत मिळाली. संपूर्ण बाटली सुरक्षितपणे काढण्यात आली आणि रुग्णाची प्रकृती सुधारल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं.

असोसिएट कन्सल्टंट डॉ. अनमोल आहुजा म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये वेळ वाया न घालवता प्रक्रिया करणे महत्वाचे असतं, कारण त्यामुळे आतडे फुटण्याचा धोका वाढतो. ते म्हणाले की, एंडोस्कोपी, सिग्मोइडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी सारख्या कमीत कमी आक्रमक तंत्रांनी यावर सुरक्षितपणे उपचार करता येतात. युनिट-3 चे उपाध्यक्ष आणि प्रमुख डॉ. तरुण मित्तल म्हणाले की, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवात त्यांनी अनेक रुग्णांना गुदद्वारात परदेशी वस्तू घालताना पाहिले आहे. अशा प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रियेसह, रुग्णाच्या मानसिक आणि भावनिक स्थितीचे मूल्यांकन देखील करणे आवश्यक आहे. डॉ. तरुण म्हणाले की, काही रुग्ण लैंगिक सुखासाठी बाटल्या, भाज्या इत्यादी गोष्टी गुदद्वारात घालतात. ही प्रवृत्ती दोन्ही लिंगांमध्ये दिसून येते. बऱ्याचदा अशा रुग्णांना एकटेपणा जाणवतो आणि उपचारादरम्यान या पैलूची देखील काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणांमध्ये समग्र दृष्टिकोन स्वीकारणे महत्त्वाचे आहे.

आपल्या शरीरात दोन प्रकारची आतडे असतात. एक म्हणजे लहान आतडे ज्याचे काम अन्न पचवण आणि त्यातून पोषण काढणे आहे. त्यानंतर, ते उरलेला कचरा मोठ्या आतड्यात पाठवते. मोठे आतडे त्यातून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स काढून टाकते आणि मल तयार करते. गुद्द्वार हा मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग असतो. 

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)