General Knowledge : संपूर्ण जगात सध्याच्या घडीला 225 देश आहेत. काही देश आकारमानाने खूप मोठे आहेत तर काही देश आकारमानाने खूप लहान आहेत. काही देशांमध्ये कोट्यवधी लोकं राहतात तर काही देशात लाख तर काही ठिकाणी हजार लोक राहतात. पण तुम्हाला जगाच्या नकाशावरील अशा देशाबद्दल सांगणात आहोत जिथे फक्त तीन कुत्रे आणि तीन माणसं राहतात. तेव्हा हा देश नेमका कुठे आहे याबाबत जाणून घेऊयात.
आपण ज्या देशाबद्दल बोलतोय तो देश संयुक्त राज्य अमेरिकेच्या नेवादामध्ये असून याला तुम्ही मायक्रोनेशन असे सुद्धा म्हणू शकता. या देशाकडे स्वतःची नौसेना, नौसेना अकादमी, डाक सेवा, बँक, अंतरिक्ष कार्यक्रम, रेलमार्ग आणि ऑनलाइन रेडियो स्टेशन सुद्धा आहे जगभरात या मायक्रोनेशनला ग्रँड रिपब्लिक ऑफ गोल्डस्टीन किंवा मोलोसिया असे सुद्धा म्हटले जाते. मोलोसियाची स्थापना 1977 मध्ये झाली होती. या देशाची लोकसंख्या केवळ 38 आहे. परंतु सध्याच्या घडीला येथे केवळ तीन कुत्रे आणि तीन माणसं राहतात. मोलोसिया हे गणराज्य स्वतःला देश म्हणत असले तरी संयुक्त राष्ट्राकडून याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
हेही वाचा : नवरा कामावरुन घरी येताच तुम्ही करता 'या' 5 चुका; आताच थांबा! नाहीतर क्लेश झालाच म्हणून समजा
मोलोसिया या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचे नाव केविन वॉ असे आहे. या देशात पोहोचल्यावर राष्ट्राध्यक्ष केविन बाघ यांच्या नावाखाली पूर्ण शीर्षक लिहिलेले दिसेल. यात महामहिम ग्रँड ॲडमिरल कर्नल डॉ. केविन वॉ, मोलोसियाचे अध्यक्ष आणि नोबलमन, राष्ट्राचे संरक्षक आणि लोकांचे संरक्षक असे लिहिलेले आहे.
मोलोसिया या देशात भेट देणाऱ्या पर्यटकांना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. या देशात कॅटफिश आणि कांद्यावर बंदी असून येथे जात असताना या दोन गोष्टी तुम्ही येथून घेऊन जाऊ शकत नाहीत. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. मोलोसिया या देशाची राष्ट्रभाषा ही इंग्रजी असून येथे एस्पेरांतो आणि स्पॅनिश या भाषा सुद्धा बोलल्या जातात. मोलोसिया देशाचे चलन व्हलोरा (Valora) हे आहे.