देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी आपल्या महागड्या छंदांसाठी ओळखली जाते. ईशा अंबानी आशियातील 12 सर्वात पावरफुल बिझनेस महिलांच्या यादीत समावेश झाला आहे. अशा या ईशा अंबानीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ईशा अंबानी आपल्या लक्झरी लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. ईशा अंबानी यांच्या मासिक पगाराबद्दल माहिती आहे का? 


ईशा अंबानी यांचं रिलायन्स ग्रुपमध्ये मोठं योगदान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ईशा अंबानी यांची महत्त्वाची भूमिका आहे. ईशा अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या डिजिटल सेवांचा विकास आणि ऑनलाइन फॅशन ब्रँड AJIO लाँच करण्यात योगदान दिले आहे. ईशा आपल्या वडिलांच्या कंपनीत अनेक गोष्टी हाताळतात. अशा परिस्थितीत ईशा अंबानी यांचा मासिक पगार किती असेल याचा विचार प्रत्येकाच्या मनात येतो?


ईशा अंबानी यांचा पगार


मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुलांचा मासिक पगाराबाबत कायमच गुप्तता पाळली आहे. रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानी यांना दर महिन्याला 35 लाख रुपये पगार मिळत असल्याचा अंदाज आहे. मात्र, अंबानी कुटुंबाकडून याबाबत कोणताही दुजोरा मिळालेला नाही.


या कंपन्यांची मालकीण आहेत ईशा अंबानी 


ईशा अंबानी यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर 2018 मध्येच फोर्ब्सने ईशा अंबानी यांची संपत्ती 70 दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 550 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता. नोकरीपासून त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्यांची पहिली नोकरी अमेरिकेतील मॅकिन्से अँड कंपनीमध्ये होती. 2014 मध्ये ईशा अंबानी यांनी रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओमध्ये सामील झाली. 2016 मध्ये, ईशा अंबानी यांनी फॅशन पोर्टल अजियो लाँच केले.


ईशा अंबानी यांचं लग्न


मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांचे लग्न पिरामल ग्रुपचे संचालक आनंद पिरामल यांच्याशी झाले आहे. ईशा आणि आनंद मुंबईतील वरळी येथे 450 कोटी रुपयांच्या 'गुलिटा' या आलिशान सी-फेसिंग बंगल्यात राहतात. आनंद पिरामल आणि ईशा अंबानी त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत.