)
शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेकजण दररोज दिवसातून एकदा तरी नक्कीच अंघोळ करतात. अंघोळ करताना शरीर स्वच्छ करण्यासाठी साबण, बॉडी वॉश किंवा शॅम्पूचा वापर करतात. शरीरातील प्रत्येक अवयव आणि भाग स्वच्छ ठेवण्यासाठीचा प्रयत्न असतो. पण तुम्हाला माहितीये का? मानवी शरीरातील एक असा भाग आहे जो स्वच्छ केल्यावर सुद्धा त्यात बॅक्टेरिया राहतात आणि तो कधीच पूर्णपणे स्वच्छ होत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट ही कि अनेकजण याकडे लक्षच देत नाहीत.
जेव्हा शरीराच्या सर्वात घाणेरड्या भागाबद्दल बोलत असतो, तेव्हा तुमच्या डोक्यात तो भाग म्हणजे नखं किंवा खाजगी जागा येईल. पण शरीरातील हे भाग तर चांगली स्वच्छ केल्यावर स्वच्छ होतातच. आपण शरीराच्या अशा भागाबद्दल बोलतोय ज्याबद्दल तुम्ही ऐकलंत तर तुम्ही माहिती मिळाल्यानंतर, शरीराच्या या भागाकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही आणि त्याच्या स्वच्छतेची नेहमीच काळजी घ्याल.
तुमच्या शरीरातील सर्वात अस्वच्छ भाग म्हणजे 'बेंबी', जिथे हजारो प्रकारचे बॅक्टेरिया वाढतात. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की बेंबीमध्ये दोन हजारांहून अधिक प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि त्यांची संख्या कोटींमध्ये असते. बेंबीत घाम येतो आणि जेव्हा आपण अंघोळ करतो तेव्हा तो स्वच्छ होत नाही, यामुळे बेंबीतूनही घामाचा वास येतो. बेंबीचा आकार छिद्रासारखा असतो, म्हणून तिथे बॅक्टेरिया सहज वाढतात.
बेंबीतील घाणीमुळे अनेकांना खूप त्रास होतो.त्या भागात खाज सुटणे आणि पुरळ येणे अशा समस्या निर्माण होतात. असे झाल्यास तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नाभी स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. पर्यायी म्हणून, तुम्ही आठवड्यातून एकदा कापसाच्या बोळ्याने हा भाग पूर्णपणे स्वच्छ करू शकता. घाण काढून टाकल्यानंतर, तो भाग पाण्याने स्वच्छ धुवा. जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा शरीराच्या इतर भागांप्रमाणेच बेंबी सुद्धा पूर्णपणे धुवा.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)
शरीरातील सर्वात अस्वच्छ भाग कोणता आहे?
मानवी शरीरातील सर्वात अस्वच्छ भाग म्हणजे बेंबी (नाभी). तिथे हजारो प्रकारचे बॅक्टेरिया वाढतात आणि तो पूर्णपणे स्वच्छ होत नाही, जरी अंघोळ करूनही.
बेंबी का इतकी अस्वच्छ राहते?
बेंबीचा आकार छिद्रासारखा असल्याने तिथे घाम, मळ आणि बॅक्टेरिया जमा होतात. अंघोळ करताना पाणी सहज पोहोचत नाही, ज्यामुळे घामाचा वास आणि बॅक्टेरिया वाढतात
बेंबी स्वच्छ ठेवण्याचे फायदे काय?
स्वच्छ बेंबीमुळे संसर्ग टाळता येतो, वास येत नाही आणि त्वचेच्या समस्या कमी होतात. यामुळे एकूण आरोग्य सुधारते.