World Cup 2023 : क्रिकेटचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या 'वर्ल्ड कप 2023' (World Cup 2023) ला सुरूवात झाली आहे. सगळीकडे सध्या याचाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. अगदी सोशल मीडियावर क्रिकेटसंबंधीत चर्चा आहे. अशावेळीच सोशल मीडियावर हे ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे.
या ऑप्टिकल इल्यूजनच्या मदतीने भारतीय संघाला पाठिंबा दिला जात आहे. वर्ल्ड कप जिंकावा यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे 'दृष्टीभ्रम' करणारी दृष्य. हे दिसतं ते नसून त्यामागे बरंच काही दडलेलं असतं. याच आशयाचा एक मजेशील ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य - Marathi Celebrity / Virat Kohli Instagram)
या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये अनेक मेंढ्या दिसत आहेत. या मेंढ्यांमध्ये भारतीय संघाचा सध्या चर्चेत असलेला खेळाडूचा फोटो लपला आहे. जर तुम्ही भारतीय संघाचे आणि या खेळाडूचे जबरा फॅन असाल तर नक्कीच फोटो ओळखाल.
या फोटोत अनेक मेंढ्या दिसतात. अतिशय मोकळा परिसर आहे. या फोटोत खूप मेंढ्या आहेत. तसेच एक झाड आणि मेंढ्यांच कुंपन दिसत आहे. या मेंढ्या मोकळ्या मैदानात चारा खात आहेत. सहज डोळ्याला हे इतरं सामान्य चित्र दिसतं. पण तुम्ही नीट थोडं नजर रोखून पाहिलात तर या फोटोत एका भारतीय क्रिकेटपटूचा फोटो लपला आहे. अन् तो खेळाडू कोण आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला एक हिंट आहे.
हे चित्र पाहताना तुम्ही आपले डोळे ७५ टक्के बंद करा आणि तिरप्या नजरेनं पाहा. खरोखरच एक चमत्कार घडेल अन् तुम्हाला या कोड्याचं उत्तर मिळेल. तरी देखील उत्तर सापडलं नाही तर निराश होऊ नका खाली दिलेला फोटो पाहा त्यामध्ये उत्तर दिलेलं आहे. पण लगेच निराश होऊ नका... थोडा प्रयत्न करा.. तुम्हाला नक्कीच याचं उत्तर सापडेल.
या फोटोत भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली आहे. विराट कोहली सध्या आपल्या खासगी आयुष्य आणि करिअर अशा दोन्ही स्तरावर चर्चेत आहे. विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. एवढंच नव्हे तर क्रिकेटमध्येही विराटकडून चाहत्यांना अनेक अपेक्षा आहेत. या फोटोत मेंढ्यांची रचना अशी केली आहे की, विराट कोहलीचा चेहरा दिसेल.