Father Son Relationship Tips: नात्यांबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की, मुली वडिलांच्या आणि मुलगे आईच्या जवळ असतात. एका विशिष्ट वयानंतर मुलाचं आणि वडिलांचं एकमत होत नाही. मुलगा मोठा झाला की, त्याच्या आणि वडिलांमध्ये मतभेद होत असल्याचं स्पष्ट होतं. असं म्हणतात की, मुलाला वडिलांची चप्पल व्हायला लागली की, वडिलांनी मुलाशी मैत्रीचं नातं निर्माण करावी. कारण जुन्या पिढीची विचारसरणी आणि आधुनिक युगाची विचारसरणी एकमेकांना मतभेद निर्माण करण्याचं कारण ठरतं. त्यांच्या वागण्याबोलण्यातही फरक आहे, त्यामुळे वडील आणि मुलाच्या नात्यात अनेकदा वाद होतात. अशा परिस्थितीत हे कसे टाळता येईल? यावर सद्गुरु जग्गी वासुदेव मार्गदर्शन करतात. 


करण जोहरच्या प्रश्नाला सद्गुरुंनी उत्तर दिले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच एका शोदरम्यान बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने सद्गुरूंना विचारले की, एका विशिष्ट वयानंतर वडील आणि मुलामध्ये तणावाची परिस्थिती का निर्माण होते आणि त्यांच्यातील अंतराचे कारण काय आहे? यावर सद्गुरू म्हणाले की, ही बाब वडिल आणि मुलांची नसून एकाच घरात राहणाऱ्या दोन व्यक्तींची आहे. एकाच घरात दोन माणसे राहतात तेव्हा त्यांच्यात मतभेद होणे स्वाभाविक आहे. हे मान्य करायला हवे. एवढेच नाही तर सद्गुरुंनी असेही सांगितले की, दोन पुरुषांच्या भांडणात आईमध्ये चिरडली जाते. कारण ही स्त्री एकाची पत्नी असते आणि दुसऱ्याची आई असते. हे सर्व दोन व्यक्तींमध्ये होणे स्वाभाविक आहे.


काय म्हणाले सद्गुरु



वडील देवासमान


आपले विचार व्यक्त करताना सद्गुरू म्हणाले की, मुलगा 9-10 वर्षांचा असतो तेव्हा त्याच्यासाठी त्याचे वडील देवापेक्षा कमी नसतात, कारण ते आपल्या मुलाची प्रत्येक गरज पूर्ण करतात आणि त्याची काळजी घेतात. पण जेव्हा मूल 15-16 वर्षांचे असते, तेव्हा समस्या सुरू होतात, कारण या वयात मुले स्वतःची विचारसरणी आणि जीवनशैली तयार होते. अशावेळी पालकांमध्ये मतभेद निर्माण होते.


अशी परिस्थिती हाताळा


सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मुलगा मोठा झाला की घरातील दोन पुरुषांमध्ये कलह सुरू होतो. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी, परस्पर समंजसपणा असणे खूप महत्वाचे आहे, दोघांनी एकमेकांचा दृष्टिकोन समजून घ्यावा आणि त्यानुसार घरगुती निर्णय घ्यावेत. तसेच मुलांनी देखील पालकांना समजून घेणे आणि पालकांनी देखील मुलाच्या विचारांचा सन्मान करणे गरजेचे आहे.