संजय राऊतांच्या नातवाचं बारसं! नावाचा अर्थ कडाडत्या तोफेप्रमाणे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या लेकीला मुलगा झाला आहे. आज या बाळाच्या बारशाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील खास उपस्थिती लावली होती. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 5, 2025, 03:05 PM IST
संजय राऊतांच्या नातवाचं बारसं! नावाचा अर्थ कडाडत्या तोफेप्रमाणे
फोटो क्रेडिट गाथा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आजोबा झाले आहेत. संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांना गोंडस मुलगा झाला आहे. या बाळाचा आज नामकरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याची चर्चा सगळीकडे होत आहे. बाळाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ काय हे जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

संजय राऊतांच्या नातवाचे नाव 

संजय राऊत यांच्या नातवाचे नाव आहे जयजीत. जयजीत हे अतिशय युनिक आणि वेगळे नाव आहे. आ नावाचा अर्थ आहे 'जो जिंकतो तो' आणि 'पराक्रमींचा विजय'. असा आहे, जो संस्कृत भाषेतील 'जय' (विजय, यश) आणि 'जीत' (जिंकणे) या शब्दांपासून बनला आहे. हे नाव मुलांसाठी वापरले जाते आणि त्याचा अर्थ विजय मिळवणारा किंवा जिंकणारा असा होतो. 

नावाचा अर्थ

जय : याचा अर्थ विजय, यश किंवा जिंकणे असा आहे. 
जीत : याचा अर्थ जिंकणे किंवा पराभव करणे असा होतो. 
त्यामुळे, 'जयजीत' या नावाचा एकत्रित अर्थ 'ज्याला विजय मिळतो' किंवा 'जो जिंकतो तो' असा होतो. 

नावाची राशी 

मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. शनि देव आणि हनुमान यांना मकर राशीचे आराध्य दैवत मानले जाते. वर्षा ऋतू संपल्यानंतर जयजीत हे नाव घेतले जाते. जयजीत नावाची मुलं अतिशय हुशार आहे. 

लग्न कधी आणि कुठे झाले?

पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांचे  लग्न २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईतील रेनेसाँ हॉटेलमध्ये पार पडले. हा एक पारंपरिक सोहळा होता, ज्यात सात फेरे घेतले गेले. तर साखरपुडा सोहळा कधी आणि कसा झाला?साखरपुडा सोहळा ३१ जानेवारी २०२१ रोजी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये झाला. हा एक छोटेखानी आणि थाटमाटात सोहळा होता, ज्यात अनेक राजकीय नेते उपस्थित होते. लग्नात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी संगीत कार्यक्रमात एकत्र नाचले.

FAQ

पूर्वशी राऊत कोण आहे?
पूर्वशी राऊत ही शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांची कन्या आहे. ती एक ज्वेलरी डिझायनर आहे आणि तिचे लग्न मल्हार नार्वेकर यांच्याशी झाले आहे.

मल्हार नार्वेकर कोण आहे?
मल्हार नार्वेकर हे आयटी इंजिनीअर आहेत. ते ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव आहेत. त्यांचा पूर्वशी राऊत यांच्याशी विवाह झाला आहे.

 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More