वेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील `हे` दुष्परिणाम
Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का?
Side Effects of Drinking Coffee News In Marathi : सकाळी उठल्या उठल्या अनेकजण चहा किंवा कॉफी पितात. सकाळी गरमागरम चहा-कॉफी आली की झोप उडते, तरतरी येते म्हणून वर्षानुवर्षे हा नियम पाळतो. इतकंच नाही तर सकाळी निघायच्या गडबडीत घरातून उपाशी पोटी निघतात, एखाद्या मिटींगच्या ठिकाणा किंवा ऑफीसमध्ये थेट कॉफीचा मग भरून पितात. कॉफी ही मिल्क मेड असल्याने चहापेक्षा चांगली आहे असा अनेकांचा समज आह. पण हिच कॉफी रिकाम्या पोटी पिय्यालाने आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. हृदयविकारासाठी, व्यायामानंतर ऊर्जा देण्यासाठी, अल्झायमरवर उपाय म्हणून किंवा त्वचा सुधारण्यासाठी कॉफीचे विविध फायदे असले तरी, रिकाम्या पोटी कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
पोटाचे आजार
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने स्त्रियांचे हार्मोनल संतुलन बिघडवते. सकाळी कॉफी प्यायल्याने कॉर्टिसोलचे उत्पादन वाढते. परिणामी, ते ताण न्यूरोट्रांसमीटरला उत्तेजित करतात. तसेच, रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पोट खराब होणे, हृदयाच्या समस्या, पोटात अल्सर, उलट्या, ऍसिडिटी आणि पचनाचे विकार होतात. काही प्रकरणांमध्ये, रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पोटाचे आजार होतात.
साखरेची पातळी वाढते
सकाळी उठल्यावर कॉफीचे सेवन केल्यास इन्सुलिनची पातळी वाढण्याची क्षमता असते. यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते किंवा ज्यांना त्याचा त्रास होतो त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते, त्याऐवजी कॉफी टाळलेली केव्हाही चांगली.
भितीसारखे वाटते
जे लोक सकाळी कॉफी पितात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. कॅफिनमुळे फाईट किंवा फ्लाईट रिप्लाय उत्तेजित होतो. यामुळे तुमच्यातील भीतीचे प्रमाण वाढते आणि तुम्हाला भीतीचे झटके येऊ शकतात.
कोर्टिसोलची पातळी कमी
जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन तयार होतो. या हार्मोन्समुळे तुम्हाला फ्रेश वाटण्यास मदत करतात. पण त्यावेळी कॉफी प्यायली तर या हार्मोनल परिणामांमुळे तुम्ही पुन्हा आळशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिकाम्या पोटी कॉफी पिण्याऐवजी दुपारच्या वेळी एखादी कॉफी प्यायलेली चालते.
खनिजांचा नाश होतो
तुमच्या शरीराच्या सुरळीत कामकाजासाठी तुम्हाला खनिजांची गरज आहे. पण नुसती रिकामी पोटी कॉफी प्यायल्याने खनिजे नष्ट होतात आणि शरीरात खनिजांची कमतरता जाणवते. त्यामुळे रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळा.
पचनाची समस्या
कॉफी तुमच्या पचन प्रक्रियेत व्यत्यय आणू शकते. तसेच, कॉफी रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरात ॲसिड तयार होते. त्यामुळे अपचन, छातीत जळजळ अशा तक्रारी उद्भवतात. अशा प्रकारे, नियमित रिकाम्या पोटी कॉफी पिणाऱ्यांमध्ये पचनाच्या समस्या उद्भवतात.