जीभेचा तुकडा पडल्याशिवाय राहणार नाही...'या' मुलाचं नाव सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

सोशल मीडियावर सध्या एका नावाची जोरदार चर्चा होत आहे. मुलांना असं नाव ठेवू नका असं अगदी स्पष्ट सांगितलं जातंय. हे नाव कोणतं? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 17, 2025, 07:50 PM IST
जीभेचा तुकडा पडल्याशिवाय राहणार नाही...'या' मुलाचं नाव सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

लहान मुलांना वेगवेगळी युनिक अशी नावं ठेवण्याचा एक ट्रेंड सुरु झाला आहे. आपल्या मुलाला सर्वोत्तम आणि थोडं हटके नाव देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे वेगवेगळ्या नावांचा विचार केला जात असतो. पण पालक असं नाव ठेवताना विचार करतात का? की आपण जे नाव ठेवतोय ते त्या मुलासाठी उच्चारणं सोप्प आहे का? 

Add Zee News as a Preferred Source

सोशल मीडियावर असाच एक ट्रेंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुलाला हे नाव बोलता येईल का? असं कोण मुलाचं नाव ठेवतं? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हे नाव सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी मुलाला तरी हे नाव उच्चारता येईल का? असा प्रश्न विचारला आहे. 

कोणतं आहे हे नाव? 

'स्न्हेत्विज' हे नाव सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. सनेह फडते या नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन  एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे की, स्न्हेत्विज- प्रेमाने विजय मिळवणारा.. Introducing Our बाळ राजे द्वितीय. 

या व्यक्तीला दुसरं बाळ झालं असून त्याने बाळाचं नाव स्न्हेत्विज ठेवलं आहे. या पोस्टला 6 दिवसांत 3277 लोकांनी लाईक केलं आहे. तसेच अनेकांनी कमेंट करुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांनी बाळाला तरी हे नाव घेता येणार आहे का? असा प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर अनेकांनी हे नाव कसं ठेवलं असेल त्याबद्दलही सांगितलं आहे. 

मुलगी झाल्यावर काय नाव ठेवाल?

आईच्या गावात अन १२ च्या भावात या पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, मुलगी झाली तर श्लेष्मजा नाव ठेवायची तजविज करा... अशी ही एक फनी पोस्ट केली आहे. ज्याखाली ही नेटिझन्सनी कमेंट केली आहे. इतकी कठीण नावं मुलांना कशी देऊ शकतात. 

मराठी व्याकरणात खरंच असे शब्द आहेत का? 

मराठी व्याकरणात खरंच असे शब्द आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण'स्न्हेत्विज' हे नाव खरंच आहे का? स्न्हे असं जोडाक्षर आहे का? तसेच व्याकरणात किंवा मराठीत असा शब्द आहे का? असा देखील प्रश्न पडला आहे. 

पालकांवरुन मुलांचं नाव ठेवण्याचा ट्रेंड? 

पालक मुलांना नावे ठेवताना वेगवेगळ्या ट्रेंडचा वापर करतात. अशामध्ये पालकांच्या नावावरुन मुलांसाठी नवं नाव तयार करणं? अशा पद्धतीने मुलांना नाव ठेवलं आहे का? असा सवालही विचारला जात आहे. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More