आता कितीही पिझ्झा खा, वजन वाढणार नाही; तज्ज्ञांनी सांगितली पिझ्झा खाण्याची सिक्रेट पद्धत...

Healthy Pizza Eating: पिझ्झा खाल्ल्याने वजन वाढते हे खरे नाही, फक्त खाण्याची पद्धत चुकीची असते; तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही सिक्रेट ट्रिक्स फॉलो केल्यास कितीही पिझ्झा खाल्ला तरी वजन नियंत्रणात राहील.

Updated: Dec 12, 2025, 01:48 PM IST
आता कितीही पिझ्झा खा, वजन वाढणार नाही; तज्ज्ञांनी सांगितली पिझ्झा खाण्याची सिक्रेट पद्धत...

Know How To Eat Pizza For Weight Loss:आजकाल प्रत्येकजण फक्त वजन कसे कमी करता येईल याचा विचार करत असतो. यासाठी काहीजण जीमला जातात, व्यायाम करतात, डाएटींगही करतात. यामुळे बाहेरचे चमचमीत मसालेदार जंकफूड जसे की, पिझ्झा, बर्गर आणि इतर तेलकट पदार्थ खाणे टाळले जाते. यामधील पाहताच क्षणी सर्वांच्या तोंडाला पाणी आणणारे जंकफूड म्हणजे पिझ्झा. पण डाएटींग करत असल्यामुळे किंवा वजन वाढेल या भीतीने पिझ्झा खाण्याची इच्छा असतानाही तो खाता येत नाही. जर तुम्ही सुद्धा या यादीत असाल तर हा लेख तुमच्या साठी एक आनंदाची बातमी ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, वजन वाढण्याचे कारण पिझ्झा खाणे नाही तर, खाण्याची पद्धत कारणीभूत ठरते. त्यामुळे तुम्ही हे सिक्रेट जाणून घेऊन योग्य पद्धतीने कितीही पिझ्झा खाल्ला तरीही तुमचे वजन वाढणार नाही.

Add Zee News as a Preferred Source

 

पिझ्झा खाण्याआधी सॅलेडचे सेवन करा:

पिझ्झा एक असे जंक फूड आहे जे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मैदा वापरला जातो. जे वजन वाढण्याचे मोठे कारण आहे असे सर्वांना वाटत असते. यामुळे इच्छा असताना देखील पिझ्झा खाणे टाळले जाते. पण तुम्ही पिझ्झा खाताना काही नियम पाळले तर, कितीही पिझ्झा खाल्ला तरी तुमचे वजन नियंत्रणात राहील. यासाठी पिझ्झा खाण्याआधी तुमच्या खाण्याची सुरूवात एक वाटी सॅलेड आणि ग्लासभर हिरव्या भाज्यांच्या ज्यूसने करा. असे केल्याने तुमच्या शरीराला पूर्वतःच फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्त्व मिळतात. याशिवाय तुमचे पोट आधीच थोडेफार भरलेले राहते आणि प्रमाणापेक्षा जास्त पिझ्झा खाणे टाळले जाते.

 

पिझ्झासह फ्रेंचफ्राईज खाणे टाळा:

तसेच तुम्ही पिझ्झा खाताना सोबत ग्रिल्ड चिकन सॅलेड किंवा डाळींचे सॅलेड खाऊ शकता. जेणेकरून तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळेल आणि पोट लवकर भरेल. प्रोटीनयुक्त सॅलेड तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे तुम्हाला जास्त भुक लागणार नाही आणि व्यतिरिक्त खाणे टाळले जाईल. रेस्तराँध्ये मिळणाऱ्या पिझ्झासह नेहमी ब्रेड बास्केट किंवा फ्रेंचफ्राईज दिले जातात. तज्ज्ञांच्या मते पिझ्झासह इतर तळलेले तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण यामध्ये असलेल्या रिफाइंड कार्ब्समुळे शरीरातील वजन वाढण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीचे प्रमाण वाढू शकते.

 

पिझ्झा खाल्ल्यानंतर काहीवेळ चाला:

सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय म्हणजे पिझ्झा खाल्ल्यानंतर फक्त 15 ते 20 मिनिटे चालणे. चालल्यामुळे तुमचे पाचन सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासही मदत होते. आयुर्वेदातही जेवल्यानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर शतपावली करण्याचा सल्ला दिला जातो. हालचाल झाल्यामुळे पोटातील अन्न एका जागी न राहता योग्यरित्या पचण्यास मदत होते. तसेच अशी एक चूक आहे जी सगळे हमखास करतात, ती म्हणजे पिझ्झा खाल्ल्यानंतर आईसक्रिम, चॉकलेट किंवा काही गोड खाणे. तज्ज्ञ सांगतात की, असे करणे प्रकर्षाने टाळले पाहिजे. यामुळे शरीरात वाईट कॉलेस्ट्रोल वाढण्याच प्रमाण जास्त असते.

 

तुम्ही सुद्धा एक पिझ्झा लव्हर असाल किंवा आज मित्र-मैत्रिणींसह पिझ्झा पार्टी करण्याचे नियोजन करत असाल तर, हे वरील नियम नक्की लक्षात ठेवा आणि वजन वाढण्याची काळजी न करता मनसोक्त पिझ्झा खा. 

About the Author