Soft Launch and Hard Launch Relationship : Gen Z अर्थातच जनरेशन Z च्या जगात सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिल्या जातात. त्यांच्यासाठी प्रत्येक शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. सध्या दोन असे शब्द ज्यांची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘सॉफ्ट लॉन्च’ (Soft Launch) आणि दुसरं म्हणजे ‘हार्ड लॉन्च' Hard Launch). खरंतर, अनेक लोकांना याविषयी जास्त माहित नाही किंवा नेमकं हे काय आहे याची कल्पना नाही. अनेकांना तर या दोन्ही गोष्टींना घेऊन कन्फ्युजन आहे. जर तुम्ही त्या लोकांपैकी एक आहे. जर तुमचाही या सगळ्यात गोंधळ होतो तर चला जाणून घेऊया...
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही गोष्टींचा संबंध हा रिलेशनशिपशी आहे. याचा अर्थ कोणत्या नात्यासाठी असेल असा प्रश्न आता तुम्हाला असेल तर रिलेशनशिपमध्ये Gen Z हे ‘सॉफ्ट लॉन्च’ आणि ‘हार्ड लॉन्च’ असे शब्द वापरत असल्याचं दिसत आहे.
सॉफ्ट लॉन्चचा अर्थ आहे की सोशल मीडिया साइटवर ही घोषणा करणं की तुम्ही कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहात. पण तुम्ही कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहात हे सांगत नाही. याचा अर्थ तुम्ही सोशल मीडिया हॅन्डलवर फेसबूक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साईट्सवर पार्टनरसोबत फोटो शेअर करायचा पण चेहरा दाखवत नाही किंवा तुम्ही त्याचं नाव सांगत नाहीत. त्याला सॉफ्ट लॉन्च किंवा पार्टनरची सॉफ्ट लॉन्चिंग करणं असं म्हणतात.
रिलेशनशिपच्या हार्ड लॉन्चिंगचा अर्थ उघडपणे आपल्या नात्याविषयी सगळ्यांना सांगणं. याचा अर्थ त्यात पार्टरची ओळख लपवणं नसतं. तुम्ही तुमच्या पार्टनरचा चेहरा दाखवता त्याचं नाव देखील सांगता.
हेही वाचा : 'सितारे जमीन पर' सारखाच आहे 'हा' हॉलिवूड चित्रपट तुम्ही पाहिलात का?
हार्ड लॉन्च करताना तुम्ही तुमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवर आपल्या आणि आपल्या पार्टनरचे फोटो पोस्ट करतात आणि चेहरा लपवत नाहीत. त्यासोबत तुम्ही तुमच्या पार्टनरचा फोटो शेअर करत त्याला टॅग देखील करता. सोप्या भाषेत हार्ड लॉन्चिंग म्हणजे तुम्ही पूर्णपणे आपल्या आणि आपल्या पार्टनरविषयी सगळं काही सोशल मीडियावर शेअर करता. तुम्ही त्यांचं नाव आणि त्यांचे फोटो शेअर करत त्यांची सगळी माहिती सोशल मीडियावर देता. थोडक्यात तुम्ही सीरियस रिलेशनशिपमध्ये आहात हे तुम्ही सोशल मीडियावर सांगता.