Which Early Signs of Vision Loss You Should Never Ignore: वय कोणतेही असो, जर डोळ्यांनी दिसत नसेल किंवा कमी दिसत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे डोळ्यांना कमी दिसू लागते. परंतु अशी काही प्रारंभी लक्षणे आहेत ज्यांच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याकडे कानाडोळा करू नये. याबद्दल अधिक जाणून घेऊयात ...
वय कोणतेही असो, हळूहळू किंवा मग अचानकच चष्मा घालूनही दृष्टी धुसर होऊ शकते, आणि याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे. प्रौढ व्यक्तींना मोतीबिंदूमुळे हळूहळू कमी दिसू लागू शकते आणि अचानक कमी दिसण्याची कारणे म्हणजे रेटिना वेगळा होणे (रेटिनल डिटॅचमेंट), रेटिनाची शिर किंवा धमनी यांमध्ये अडथळा निर्माण होणे, मधुमेह संबंधी रेटिनोपॅथीमध्ये बदल होणे ही असतात आणि त्यात व्हिट्रीयस हेमोर्र्हेज सामील असून त्यांच्यामुळे अचानकच दृष्टी जाऊ शकते व शक्य तितक्या लवकर हे कळविले पाहिजे.
म्हणून नोंदविल्यानुसार, वरील सर्व बाबी दृष्टी कमी होण्याची प्रारंभी लक्षणे असू शकतात आणि ही जर लवकर कळली, तर परिणामकारक सुधारणा केल्या जाऊ शकतात, दृष्टी जपता येते आणि पुढे जाऊन दृष्टी जाणे रोखता येऊ शकते आणि त्यावर उपचार केले जाऊ शकतात.
म्हणून जर आपल्याला अस्पष्ट दिसत असेल, गोष्टी दुहेरी दिसत असतील, काळे डाग दिसत असतील, डोळ्यांपुढे क्षणिक लख्ख प्रकाश (फ्लॅशेस) किंवा गोष्टी तरंगताना दिसत असतील (फ्लोटर्स) अथवा कोणत्याही सामान्य वस्तू तिच्या वास्तविक स्वरूपापेक्षा विद्रूप दिसत असेल, म्हणजेच प्रतिमा विद्रूप दिसत असेल, तर आपण नक्कीच याची दखल घेतली. नंबरचा चष्मा लावावा लागणाऱ्या, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या आणि कुटुंबात ग्लुकोमाचा इतिहास असलेल्या 50 वर्षांहून मोठ्या सर्व जेष्ठ रुग्णांनी विशेषतः सतर्क राहिले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे आणि या लक्षणांबद्दल त्वरित कळविले पाहिजे. तसेच त्यांनी दरवर्षी किमान एकदा डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.