What to do to Avoid Prostate Cancer: प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होणारा कॅन्सर आहे. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि मलाशयासमोर असते, आणि ती वीर्य निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते. कॅन्सर झाल्यावर या ग्रंथीतील पेशी अनियंत्रितपणे वाढतात, आणि सुरुवातीला कोणतीही लक्षणे नसली तरी नंतर लघवी करताना त्रास, रक्त, वेदना किंवा लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो. अमेरिकेत पुरूषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग हा सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे.
डॉक्टरांच्या मते, प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे हे लवकर समजल्यास त्यावर उपचार शक्य आहेत. डिजिटल रेक्टल तपासणी (DRE) आणि PSA रक्त तपासणीद्वारे याचे निदान करता येते. ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या पुरुषांनी ही तपासणी नियमित करणे गरजेचे आहे. कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असल्यास ही तपासणी ४० व्या वर्षापासूनच नियमितपणे करायला सुरुवात करावी.
लठ्ठपणामुळे हार्मोनल असंतुलन होते आणि कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे दररोज किमान २०-३० मिनिटे चालणे किंवा योगासने केल्याने वजन नियंत्रणात राहते.
व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि प्रतिकारशक्तीही वाढते. आठवड्यातून किमान ५ दिवस अॅक्टिव राहिल्यास कॅन्सरपासून संरक्षण मिळू शकते.
हेल्दी राहण्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. त्यामुळे फळे, भाज्या, धान्ये आणि अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थाचे सेवन करा. फॅट्सवाले आणि प्रोसेस्ड फूड टाळल्यास प्रोस्टेटवर ताण येत नाही.
व्हिटॅमिन D आणि E या व्हिटॅमिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. त्यामुळे हे आपल्या शरीरात असणे गरजेचे आहे. पण लक्षात घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे कोणतेही सप्लिमेंट घेणे टाळा.
तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्य हे कॅन्सरजन्य घटकांमुळे धोकादायक ठरतात. हे पदार्थ प्रोस्टेट ग्रंथीच्या पेशींना नुकसान पोहोचवतात.
५० वर्षांनंतर दरवर्षी PSA टेस्ट आणि DRE करून घ्या. कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असल्यास ४० व्या वर्षांपासून तपासणी सुरू करावी.
दीर्घकालीन मानसिक तणाव शरीरात हॉर्मोनल बदल घडवतोतात. मेडिटेशन, प्राणायाम आणि सकारात्मक विचारांमुळे तणाव नियंत्रणात राहतो.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)