आवडत्या महिलेसोबत लग्न करुनही पुरुष का करतात Extra Marital Affair? सायकोलॉजिस्टने सांगितलं यामागचं खरं कारण?

Relationship Tips : आजकाल विवाहित नात्यांमध्ये विवाहबाह्य संबंध ही एक मोठी समस्या बनली आहे. सोशल मीडिया आणि चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या विवाहबाह्य संबंधांमुळे नकारात्मक परिणाम होतो. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 19, 2025, 08:30 PM IST
आवडत्या महिलेसोबत लग्न करुनही पुरुष का करतात Extra Marital Affair? सायकोलॉजिस्टने सांगितलं यामागचं खरं कारण?

लग्न हे एक असं पवित्र नातं आहे ज्यामध्ये एकनिष्ठता अतिशय महत्त्वाची वाटते. पण हल्ली या नात्यातील पावित्र्य किंवा विश्वास कमी होताना दिसत आहे. लग्न होऊनही अनेकजण मग ते स्त्री असो किंवा पुरुष इतर व्यक्तीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. या विवाहबाह्य संबंधाला Extramarital Affair असं म्हटलं जातं. अगदी प्रेम विवाह करुनही, मनासारखी पत्नी मिळूनही अनेक पुरुष इतर महिलेसोबत नात्यात अडकताना दिसतात. असे का होते? यामागची मानसिकता काय? हे समजून घेणार आहोत. विवाहबाह्य संबंध म्हणजे काय? हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 

विवाहबाह्य संबंध म्हणजे काय? 

जेव्हा एखादा विवाहित व्यक्ती त्याच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाशी तरी संबंध ठेवतो तेव्हा त्याला विवाहबाह्य संबंध म्हणतात. जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याशिवाय इतर कोणाशी तरी भावनिक आणि शारीरिक संबंध ठेवतो तेव्हा त्याला विवाहबाह्य संबंध असेही म्हणतात.

विवाहबाह्य संबंधांना 7 कारणं महत्त्वाची 

  • जेव्हा तुम्ही लग्नात एकमेकांना भावनिकदृष्ट्या समाधानी करू शकत नाही तेव्हा अंतर वाढू लागते. तुमचे शारीरिक संबंध चांगले असण्याची शक्यता असते, परंतु जर तुम्ही एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडू शकत नसाल तर हे अंतर वाढण्याची शक्यता देखील असते.
  • बऱ्याचदा लग्नानंतर सर्व काही ठीक चालते, परंतु काही काळानंतर पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो. त्यांच्यात पूर्वीसारखे प्रेम राहत नाही. हे देखील दोघांमधील अंतराचे एक कारण आहे. अशा परिस्थितीत, जर एखादी स्त्री किंवा पुरुष बाहेरून प्रेम आणि प्रेम दाखवत असेल, तर त्याला किंवा तिला दुसरा पर्याय चांगला सापडणे स्वाभाविक आहे.
  • नाते काहीही असो, प्रशंसा केल्याने ते कायम फ्रेश राहते. दुसरीकडे, जर तुम्ही एकमेकांकडे लक्ष दिले नाही, तर अंतर वाढणे स्वाभाविक आहे. आता या स्थितीत, जर बाहेरचा माणूस येऊन त्या परिस्थितीचा फायदा घेऊ लागला तर समोरची व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होऊ शकते. 
  • काही लोकांची जीवनशैली सारखीच असते. त्यामुळे कंटाळा येऊ लागतो. लग्न हे असे बंधन आहे ज्यामध्ये तुम्हाला नवीनतेची आवश्यकता असते. जर असे झाले नाही तर जोडीदार बाहेरील जगात नवीनता शोधू लागतात. नातं कितीही जुनं असलं तरीही त्यामध्ये नावीण्य असणे गरजेचे असते. 
  • अनेकदा असं होतं की, याची सुरुवात एका जोडीदाराकडून होते. त्यानंतर बदल्याची भावना म्हणून दुसरा जोडीदारही या जाळ्यात अडकतो. यामुळे देखील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतात.
  • तसेच नात्यात कायम एकमेकांना अटेंशन देणं गरजेचं असतं. बऱ्याचदा या गोष्टीचा नात्यात अभाव असतो. त्यावेळी एखादी व्यक्ती भावनिक आधारासाठी दुसऱ्या व्यक्तीचा विचार करु शकतो. 
  • काही लोकांना नावीण्य हवं असतं. एकाच जोडीदारासोबत संसार करुन कंटाळा आल्यावर नावीण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा आधार शोधला जाऊ शकतो. अशावेळी ती व्यक्ती दोन्ही व्यक्तींना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते.