)
ब्रेस्ट कॅन्सर हा सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक मानला जातो, हा कर्करोग महिलांमध्ये जास्त आढळतो. पण हा कर्करोग महिलांना होण्याचे कारण काय? यासंदर्भात तुम्हाला या लेखात माहिती देणार आहोत. ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांना होण्याच्या कारणांमध्ये आनुवंशिकता, जीवनशैली, हार्मोन्स आणि वाढते वय यांसारखी कारणे मानली जात आहेत. अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनांमध्ये अशा काही सवयी आहेत, ज्याच्याकडे आापण अनेकदा दुर्लक्ष करतो. स्त्रीरोगतज्ञ डॉ. अंबरीन यांनी त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे एक महत्वाची माहिती ब्रेस्ट कॅन्सरद्वारे शेअर केली आहे यासंदर्भात तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
स्त्रीरोगतज्ञ डॉ. अंबरीन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले आहे की तुमच्या पतीची एक सवय देखील ब्रेस्ट कॅन्सर धोका वाढवू शकते. अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करत आहेत, जर त्यांच्या पतींनी आपल्या सवयी सुधारल्या नाहीत, तर त्या स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराला बळी पडू शकतात. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या पतीला धूम्रपानाची सवय असेल, तर ते केवळ त्यांच्यासाठीच धोकादायक नाही, तर त्याचा तुमच्या आरोग्यावरही तितकाच नकारात्मक परिणाम होतो, त्याला 'पॅसिव्ह स्मोकिंग' म्हणतात.
अनेकदा आपण ऐकले आहे आणि पाहिले की धूम्रपान केल्यानंतर कर्करोग होतो. पण जर एखादी व्यक्ती स्वतः धूम्रपान करत नसेल पण परंतु वारंवार दुसऱ्याच्या सिगारेटचा धूर श्वासावाटे घेत असेल तर त्याच्या जीवाला देखील धोका असतो. स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पॅसिव्ह स्मोकिंगमुळे स्तनाचा कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनाच्या समस्यांचा धोका लक्षणीयरीत्या वाढ जातो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार निष्क्रिय धूम्रपानादरम्यान तुम्ही 7000 हून अधिक रसायने श्वासावाटे आत घेता त्यामुळे त्यामध्ये 70 हून अधिक कर्करोग-कारक पदार्थ असतात.
हे ही वाचा
जर तुमचे पती धूम्रपान करत असतील तर त्यांना त्याचा त्रास होणार आहेच, त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका हा 20 ते 30 टक्के तुम्हालाही होऊ शकतो. यामुळे डीएनएचे नुकसान आणि हार्मोनल असंतुलनाचा धोकाही संभवतो. यावर जर तुम्हाला उपाय सांगायचे झाले तर तुमच्या पतीची ही सवय सोडवण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करणे. आजूबाजूच्या लोकांवरही नकारात्मक परिणाम त्याचा होतो हे त्यांना पटवून देणे गरजेचे आहे. तुम्ही स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही लहान गोष्टी करू शकता त्यांना घरामध्ये किंवा बंद खोल्यांमध्ये धूम्रपान करू देऊ नका. खोलीत हवा खेळती राहील याची काळजी घ्या आणि धुराच्या संपर्कात येणे शक्य तितके कमी करण्याचा प्रयत्न करा.