Simple Bhaji Recipe: हिवाळ्यामध्ये बाजारात सहज उपलब्ध असणारी पालेभाजी म्हणजे चकवतीची भाजी. या पोषक आणि कसदार भाजीला रानभाजीदेखील म्हणतात. बऱ्याचवेळी लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत कारण आपण त्या एकाच बेचव पद्धतीने बनवतो. अशावेळी ही मोजक्याच साहित्यात तयार होणारी चविष्ट भाजी ट्राय करा.
हिवाळ्यतच बाजारात येणाऱ्या रानभाज्या किंवा पालेभाज्या या गारव्याच्या दिवसांमध्ये शरीराला उबदारपणा देतात. या भाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातसुद्धा मदतरुप ठरतात. तर मग आत्ताच बनवा ही सोप्प्या पद्धतीची चवदार भाजी.
साहित्य
चाकवत भाजी (आवश्यकतेनुसार)
लसूण पेस्ट 2 चमचे
4 हिरव्या मिरच्या
जिरे
मोहिरीचे तेल 4 चमचे
मीठ चवीनुसार
गरम मसाला
इतर मसाले चवीनुसार
पाणी
कांदा बारीक चिरलेला
कृती
1. चाकवत भाज बनवण्याआधी 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवा.
2. एका कुकरमध्ये थोडे पाणी घालून ही भाजी दोन शिट्टा घेऊन शिजवा.
3. कुकर थंड झाला की भाजीतले पाणी पिळून काढून घ्या आणि भाजी वाटून घ्या. कढईत तेल गरम होऊ द्या.
4. गरम तेला मध्ये जिरे घाला त्यानंतर चिरलेल्या मिरच्या आणि लसूण पेस्ट घाला नंतर कांदा टाका.
5. कांदा छान गुलाबी होऊ द्या. कांदा योग्य पद्धतीने शिजला की त्यात वाटून घेतलेली भाजी टाका.
6. चकवतीची भाजी आर्धी शिजताच वेगवेगळे मसाले घाला तसेच चवीनुसार मिठ घाला. 2 ते 3 मिनिटे भाजी नीट शिजू द्या.
7. पाच ते दहा मिनिटांमध्ये मोजक्याच साहित्यात तुमची चकवतीची चमचमीत भाजी तयार होईल.
8. ही पौष्टीक भाजी कोथिंबीरने गार्निश करुन गरमागरम चपाती सोबत सर्व्ह करा.
जर तुम्हाला पोष्टीक जेवणाची आवड असेल तर तुम्ही या रानभाजीची कोशिंबीरसुद्धा करु शकता, ते सुद्धा अवघ्या पाच मिनिटांत
कोशिंबीर तयार करण्यासाठी साहित्य
चकवत भाजी 2 कप
दही 2 कप
2 बारीक चिरलेल्या मिरच्या
1 चमचा बारीक चिरलेले आले
काळे मिठ (चवीनुसार)/ चाट मसाला
1/2 चमाचा भजलेल्या जिऱ्याची पावडर
1/2 काळी मिरी पावडर
मोहिरीचे तेल
कृती
भाजी स्वच्छ करुन बारीक चिरुन घ्या. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करुन भाजी मऊसर होइपर्यंत शिजवा. शिजलेली भाजी थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून करुन घ्या. एका मोठ्या बाऊलमध्ये दही, चाट मसाला, चिरलेल्या मिरच्या, आले, जिरेपूड आणि थोडेसे मिठ घालून मिक्स करा. शेवटी शिजवून थंड केलेली भाजी घाला. सगळे पदार्थ नीट मिक्स करुन पौष्टीक कोशिंबीर सर्व्ह करा.
LIVE|
WI
(35.1 ov) 95/6 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.