ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट : कोण मारणार बाजी?

ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट : कोण मारणार बाजी?

ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट 

17 Oct 2017, 12:25 वाजता

रायगड :  माणगाव तालुक्यातील प्रतिष्ठेच्या गोरेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

17 Oct 2017, 12:25 वाजता

रायगड :  श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश , महत्वाच्या दिवेआगर, वाळवटी , रानवली या ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे

17 Oct 2017, 12:24 वाजता

रायगड : अलिबाग तालुक्यातील ६ पैकी ५ ग्रामपंचायती शेकापकडे , १ काँग्रेस , शिवसेनेच्या हाती भोपळा

17 Oct 2017, 12:23 वाजता

  सिंधुदुर्ग : पहिल्या टप्प्याच्या निवडणूक निकालात राणेंच्या समर्थ विकास पेनेलची आघाडी,  सावंतवडी, मालवण, कुडाळ, कणकवलीत राणेंची आघाडी , शिवसेना भाजप आणि समर्थ आघाडीत चुरस

17 Oct 2017, 12:22 वाजता

नागपूर : सावंगा येथे काँग्रेसने भाजपला पराभवाची चव चाखलेय, सावंगा / नागपूर ग्रामीण तालुका ( सदस्य संख्या ७  सदस्य + १ सरपंच ), सरपंच पदी cong समर्थित उमेदवार विजयी, सर्व ७ जागी काँग्रेस पुरस्कृत सर्व उमेदवार विजयी

17 Oct 2017, 12:20 वाजता

नागपूर : लाव्हा / नागपtर ग्रामीण तालुका ( सदस्य संख्या १५ सदस्य + १ सरपंच ) ,सरपंचपदी भाजप  पुरस्कृत उमेदवार विजयी, चार भाजप प्रणित पॅनेलचे उमेदवार विजयी, तर ५ जागी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विजयी

17 Oct 2017, 12:19 वाजता

नागपूर : खडगाव - नागपूर ग्रामीण तालुका ( सदस्य संख्या ९ सदस्य + १ सरपंच ), सरपंचपदी भाजप  पुरस्कृत उमेदवार विजयी, या ठिकाणी भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार विजयी

17 Oct 2017, 12:18 वाजता

नागपूर : गुमथडा - नागपूर ग्रामीण तालुका ( सदस्य संख्या ७  सदस्य + १ सरपंच ), सरपंचपदी भाजप  पुरस्कृत उमेदवार विजयी, भाजप पुरस्कृत पॅनलचे ६ उमेदवार विजयी, १ काँग्रेस  पुरस्कृत उमेदवार विजयी

17 Oct 2017, 12:18 वाजता

नागपूर : भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार विजयी.

भरतवाडा  - नागपूर ग्रामीण तालुका ( सदस्य संख्या ७ सदस्य + १ सरपंच ) 

सरपंचपदी भाजप  पुरस्कृत उमेदवार विजयी, या ठिकाणी भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार विजयी

17 Oct 2017, 11:19 वाजता

पालघर : पालघरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान दोन गटात राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण