Live Blog - महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Live Blog - महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

14 Aug 2022, 20:08 वाजता

Vande mataram replacing Hello in government offices: शासकीय कार्यालयात हॅलो ऐवजी आता 'वंदे मातरम्' सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. सांस्कृतिक खातं मिळाल्यानंतर पहिलाच निर्णय.

14 Aug 2022, 19:36 वाजता

Deepak Kesarkar on Cabinet Portfolio: खातेवाटपावरून मंत्री दीपक केसरकरांचे नाराजीचे सूर, कोकणासाठी उद्योग आणि PWD खातं महत्वाचं, दिलेल्या खात्याबद्दल फारशी माहिती नसल्याचं केसरकरांचं वक्तव्य.

14 Aug 2022, 17:45 वाजता

IMD alert: चंद्रपूर, गडचिरोलीत  पुढील 24 तास पावसाचा  रेड अलर्ट तर  नागपूर, भंडारा आणि गोंदियामध्ये ऑरेंज अलर्ट.

14 Aug 2022, 17:22 वाजता

Gunaratna Sadavarte attack: अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना धक्काबुक्की, मेटेंच्या अंत्यदर्शनावेळी सदावर्तेंना धक्काबुक्की.मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं संताप.

14 Aug 2022, 16:51 वाजता

Minister portfolio: गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा मंत्री,अब्दुल सत्तार- कृषी मंत्री, उदय सामंत- उद्योग मंत्री, संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना मंत्री, शंभूराज देसाई- उत्पादन शुल्क मंत्री. शंभूराज देसाई- उत्पादन शुल्क मंत्री, दीपक केसरकर- शालेय शिक्षणमंत्री 

14 Aug 2022, 15:26 वाजता

Minister portfolio: राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, देवेंद्र फडणवीस- गृह आणि अर्थ मंत्रालय, सुधीर मुनगंटीवार-वन,सांस्कृतिक मंत्रालय, राधाकृष्ण विखे पाटील- महसूल मंत्री, चंद्रकांत पाटील- उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री. विजयकुमार गावित- आदिवासी विकास मंत्रालय, गिरीश महाजन- ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्रालय 

14 Aug 2022, 15:14 वाजता

Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या अपघाताची 8 पथकांकडून चौकशी करण्यात येणार, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईच्या फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळाची पाहणी, मेटेंचा चालक एकनाथ कदमची पोलिसांकडून चौकशी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं अपघातग्रस्त ट्रकचा तपास करणार.

14 Aug 2022, 14:26 वाजता

Maharashtra Cabinet PortFolio : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये खातेवाटपावर अंतिम चर्चा, राज्यपालांकडे खातेवाटपाची अंतिम यादी सुपूर्द केल्याची सूत्रांची माहिती, आज किंवा उद्या खातेवाटप होण्याची शक्यता

14 Aug 2022, 12:45 वाजता

Vinayak Mete Death : विनायक मेटेंचं अकाली निधन वेदना देणारे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त

14 Aug 2022, 12:09 वाजता

Vinayak Mete Death : मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेला नेता हरपला, उदयनराजे भोसलेंची विनायक मेटेंना श्रद्धांजली.