close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

LIVE UPDATE : लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

LIVE UPDATE : लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

24 May 2019, 10:05 वाजता

लोकसभा निकाल २०१९ : महाराष्ट्र - एकूण ४८ जागांपैंकी अंतिम स्थिती अशी आहे - भाजपा २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस ४, काँग्रेस १, एआयएमआयएम १ आणि अपक्ष १ जागा

24 May 2019, 09:27 वाजता

गडचिरोली : भाजप उमेदवारी अशोक नेते ७७,५२६ मतांनी विजयी घोषित | भाजप - अशोक नेते - ५,१९,९६८ मतं | काँग्रेस - डॉ. नामदेवराव उसेंडी - ४,४२,४४२ मतं | वंचित बहुजन आघाडी - रमेशकुमार गजबे - १,११,४६८ मतं 

24 May 2019, 09:27 वाजता

चंद्रपूर : ३२ व्या फेरीनंतर काँग्रेसचे बाळू धानोरकर ४४७६३ मतांनी विजयी घोषित | काँग्रेस - बाळू धानोरकर - ५,५९,५०७ मतं | भाजप - हंसराज अहीर - ५,१४,७४४ मतं | वंचित बहुजन आघाडी - राजेंद्र महाडोळे - १,१२,०७९ मतं

23 May 2019, 15:44 वाजता

उत्तर प्रदेश : मुलायम सिंह कुटुंबीयांना मोठा धक्का, कन्नौजमधून डिम्पल यादव, बदायूतून धर्मेंद्र यादव आणि फिरोजाबादहून अक्षय यादव पिछाडीवर | अखिलेश यादव आझमगडमधून आघाडीवर

23 May 2019, 14:15 वाजता

अहमदनगर : माझं सीमोल्लंघन झालेलं आहे. अहमदनगर आणि शिर्डीचे अंतिम निकाल येऊ द्या, राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकृतरित्या भाजप प्रवेशाचे संकेत

23 May 2019, 14:14 वाजता

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना फोनवरून दिल्या विजयाच्या शुभेच्छा

23 May 2019, 11:41 वाजता

बारामतीत १२ व्या फेरीअखेर सुप्रिया सुळे यांनी मिळवलं ७० हजारांच्या वर मताधिक्य

23 May 2019, 11:41 वाजता

ठाणे : बोलघेवड्या उमेदवारापेक्षा काम करणाऱ्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली - पालकमंत्री एकनाथ शिंदे 

23 May 2019, 11:39 वाजता

मुंबईतील सहाही मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपच्या उमेदवारांची भरभक्कम आघाडी

23 May 2019, 11:24 वाजता

अमेठीत भाजपाच्या स्मृती इराणींनी पुन्हा राहुल गांधी यांना टाकलं मागे | स्मृती इराणींची ७६०० मतांनी आघाडी