Nashik MLC Election Result : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Nashik MLC Election Result : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी

3 Feb 2023, 00:23 वाजता

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंचा विजय

Nashik MLC Election Result : नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंचा(Satyajeet Tambe) विजय. 
मविआच्या शुभांगी पाटील(Shubhangi Patil) यांचा केला पराभव. सत्यजित तांबेंनी 29,465 मतांनी मारली बाजी. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंना 68,999 मतं मिळाली आहेत. शुभांगी पाटील यांना 39,534 मतं मिळाली.

 

 

2 Feb 2023, 23:05 वाजता

मविआच्या सुधाकर अडबालेंचा दणदणीत विजय

Nagpur MLC Election Result : नागपूर शिक्षक मतदारसंघ (Nagpur Teachers Constituency) निवडणुकीत मविआचे उमेदवार सुधाकर अडबालेंचा(Sudhakar Adbale) विजय.  सुधाकर अडबालेंनी भाजपप्रणित उमेदवार विद्यमान आमदार नागो गाणारांचा (Nago Ganar) 8 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केलाय. सुधाकर अडबालेंना 16 हजार 700 मतं मिळाली आहेत, तर गाणारांना केवळ 8 हजार 211 मतं मिळाली. शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडेंना (Rajendra Zade)3 हजार 403 मतं मिळाली आहेत. मतांचा कोटा 16 हजार 477 असताना अडबालेंना 16,700 मतं मिळाली.

बातमी पाहा - फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात माविआचा दणदणीत विजय, 12 वर्षाची परंपरा उद्धवस्त!

2 Feb 2023, 19:57 वाजता

हसन मुश्रीफ चेअरमन असलेल्या बँकेवर ईडीचा छापा

ED Raid on Kolhapur Dist. Central Bank : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) चेअरमन असलेल्या बँकेवर ईडीचा छापा. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये (Kolhapur Dist. Central Bank) ईडीनं तब्बल 30 तास कसून चौकशी केली. चौकशीनंतर जिल्हा बँकेच्या 5 अधिकाऱ्यांना ईडीनं ताब्यात घेतलंय. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक माने, साखर कारखान्याचे व्यवस्थापक आर.जे. पाटील,  उप व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, साखर कारखाना निरीक्षक सचिन दोदकर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी बँकेतल्या कागदपत्रांची झाडाझडती घेतली. दरम्यान, ईडीच्या या कारवाईविरुद्ध फाइट देणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

बातमी पाहा - राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ चेअरमन असलेल्या बँकेवर ED ची धाड; 5 जण चौकशीसाठी ताब्यात

2 Feb 2023, 19:20 वाजता

परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हुसकावून लावलं

Bhandup Fish Market Controversy : मुंबईतील भांडुपमध्ये स्थानिक कोळी महिलांनी (Local Fish Seller) परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हुसकावून लावलंय. भांडुपमधील गाढव नाका ते आनंदनगरपर्यंत मासे विक्री करण्यासाठी अधिकृत स्टॉल्स मांडले असताना देखील अनेक परप्रांतीय मासे विक्रेते हे रस्त्यांवर विविध ठिकाणी मासे विकताना दिसतात. परप्रांतीयांमुळे मासळी बाजारात ग्राहकांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे कोळी महिलांनी परप्रांतीय मासे विक्रेत्यांना पकडलं. त्यांच्या टोपल्यांमध्ये फिनेल ओतून पळवून लावलं. स्थानिक नगरसेवकांच्या विरोधात देखील या महिलांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण होते.

बातमी पाहा - https://bit.ly/3Y4DmbO

 

 

2 Feb 2023, 17:31 वाजता

परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हुसकावून लावलं

Bhandup Fish Market Controversy : मुंबईतील भांडुपमध्ये स्थानिक कोळी महिलांनी (Local Fish Seller) परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हुसकावून लावलंय. भांडुपमधील गाढव नाका ते आनंदनगरपर्यंत मासे विक्री करण्यासाठी अधिकृत स्टॉल्स मांडले असताना देखील अनेक परप्रांतीय मासे विक्रेते हे रस्त्यांवर विविध ठिकाणी मासे विकताना दिसतात. परप्रांतीयांमुळे मासळी बाजारात ग्राहकांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे कोळी महिलांनी परप्रांतीय मासे विक्रेत्यांना पकडलं. त्यांच्या टोपल्यांमध्ये फिनेल ओतून पळवून लावलं. स्थानिक नगरसेवकांच्या विरोधात देखील या महिलांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण होते.

बातमी पाहा - https://bit.ly/3Y4DmbO

 

2 Feb 2023, 15:13 वाजता

सोनं 60 हजारी पार

Gold Rate : सोन्याचे दर प्रतितोळा ६० हजार रुपयांवर गेले आहेत. सोन्यानं साठ हजारांचा टप्पा आज ओलांडला आहे. पहिल्यांदाच सोन्यानं साठ हजारांचा विक्रमी टप्पा गाठलाय. ऐन लग्न सराईत सोन्याला झळाळी मिळाल्यामुळे ग्राहकांना त्याची झळ बसणार आहे. 

बातमी पाहा - सोन्यानं गाठला उच्चांकी दर, सोनं 60 हजारी पार

2 Feb 2023, 14:38 वाजता

हिंगोलीत 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त

Hingoli Crime : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथमध्ये बनावट नोटा बनवणारं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1 कोटी 14 लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्यात. याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आलीय. रात्री काही जण भांडत होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि हे रॅकेट समोर आलं. बनावट 1 लाख रुपयांच्या बदल्यात 3 लाख रुपये दिले द्यायचे...अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी होती. औंढा इथून 6 जण तर खामगाव इथून 3 आरोपींना अटक करण्यात आलीय. मुख्य आरोपी संभाजीनगरचा रहिवासी आहे...संभाजीनगर, नांदेड, लातूर याही भागातील काही आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. चौकशीतून मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यताय. 

2 Feb 2023, 13:04 वाजता

कोकणात भाजपचा मविआला धक्का

Konkan MLC Election Result : विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने (BJP) पहिल्या विजयाची नोंद केलीय.. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी (Dnyaneshwar Mhatre) शेकापच्या बाळाराम पाटील यांचा (Balaram Patil) पराभव केलाय. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची 20 हजारपेक्षा जास्त मत पडली.. तर शेकापच्या बाळाराम पाटील यांना फक्त 9 हजार 500 मतं पडली आहेत. बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. तरी त्यांचा पराभव झाल्यानं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.. सविस्तर बातमीसाठी इथं क्लिक करा.

विधानपरिषद निवडणुकांचे LIVE अपडेट्स एका क्लिकवर : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

2 Feb 2023, 12:10 वाजता

पुण्यात खाकीचा धाक नाही का?

Pune Crime : पुण्यातील येरवड्याच्या लक्ष्मी नगर परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंगळवारी ही घटना घडलीय. यामध्ये अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. दहशत पसरविण्यासाठी नशेमधील गुंडांच्या टोळक्यानं हे कृत्य केल्याची माहिती मिळतेय.  येरवडा लक्ष्मी नगर परिसरात वाहनांची तोडफोड, पेट्रोल चोरी, हत्यारे घेऊन दहशत निर्माण करणं हे प्रकार वारंवार घडतायत. अशा गंभीर घटनांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेत. घटनास्थळी येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरुय. काही संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचंही येरवडा पोलिसांनी सांगितलंय. एकंदरीतच गुन्हेगारांकडून दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्यामुळे येरवडा लक्ष्मी नगर परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

बातमी पाहा - येरवड्यात 25 गाड्या फोडल्या! पोलीस प्रशासन एकदम थंड

2 Feb 2023, 11:53 वाजता

RBIकडून अदानी समूहाच्या व्यवहारांची चौकशी?

Gautam Adani : रॉयटर्सच्या हवाल्यानं सर्वात मोठी बातमी... रिझर्व्ह बँकेने (RBI) अदानी समूहाच्या (Adani Group) व्यवहारांची माहिती मागवली आहे... अदानी समूहाला सरकारी बँकांनी मोठ्या रकमेची कर्ज दिलेली आहेत.. या बँकांमध्ये  स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India), स्टेट बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक (HDFC Bank) अशा बड्या बँकांचा समावेश आहे.. या बँकांनी अदानी समुहाला दिलेल्या कर्जाविषयी सद्यस्थिती काय आहे याची माहिती सादर करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिलेत.. तेव्हा रिझर्व्ह बँक या सर्व व्यवहारांची चौकशी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

बातमी पाहा - सर्वात मोठी बातमी! RBI ने मागवली Adani समूहाच्या अर्थिक व्यवहाराची माहिती