Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्या ठाणे दौऱ्यावर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Uddhav Thackeray  : उद्धव ठाकरे उद्या ठाणे दौऱ्यावर

25 Jan 2023, 17:05 वाजता

जुन्या पेंशन योजनेबाबत नकारात्मक नाही- उपमुख्यमंत्री

Devendra Fadnavis on Old Pension : जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. जुन्या पेंशन (Old Pension)योजनेबाबत सरकार नकारात्मक नाही असं त्यांनी संभाजीनगरमधल्ये शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं. ही योजना काँग्रेस-राष्ट्रवादीनं बंद केली. मात्र सुरू करण्याची धमक केवळ आमच्यात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट केलंय.

25 Jan 2023, 16:24 वाजता

उद्धव ठाकरे उद्या ठाणे दौऱ्यावर

Uddhav Thackeray TO Visit Thane Tomorrow : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या ठाण्याचा दौरा करणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरेंचा हा पहिलाच ठाणे दौरा असणार आहे... यानिमित्तानं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटानं सुरू केलीय. ठाणे दौऱ्यात ते टेंभी नाक्यावरील आनंद दिघेंच्या (Anand Dighe) पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. येत्या 27 जानेवारीला दिघेंची जयंती आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधीच ते आनंदमठा शेजारील पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.

बातमी पाहा- बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाणार

25 Jan 2023, 15:52 वाजता

गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी मुरलीधर जाधव कायम

Gokul Milk : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav)यांचे गोकुळ दुध (Gokul Milk) संघातील संचालक पद कायम करण्याचा न्यायालयाचा निर्णय. शिंदे फडणवीस सरकारनं संचालक पद रद्द केलं होतं. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जाधव यांना दिले होते स्वीकृत संचालक..

25 Jan 2023, 14:06 वाजता

नागपूर पोलिसांची बागेश्वर बाबाला क्लीन चिट?

Nagpur Bageshwar Baba : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आव्हान दिल्यामुळे चर्चेत आलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण महाराजांना (Bageshwar Baba) नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) क्लीनचिट दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी नागपूरमधील दरबाराचं  ६ तासांचं फुटेज तपासलं त्यात कुठेही अंधश्रद्धा पसरवली जातेय असं आढळलं नाही. त्यामुळ पोलीस दखलपात्र गुन्हा दाखल करणार नाहीत असं नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय. या संदर्भातली माहिती आजच श्याम मानव यांना दिली जाईल. 

25 Jan 2023, 13:10 वाजता

'पठाण'चा मराठी सिनेमांना फटका,मल्टिप्लेक्स मिळेनात

Amey Khopkar On Pathan Movie : शाहरुख खानचा पठाण सिनेमा मोठ्या धुमधडाक्यात प्रदर्शित झालाय.. मात्र त्याचा मोठा फटका मराठी सिनेमांना बसलाय.. बांबू (Bambu) आणि पिकोलो (Pikolo) या मराठी चित्रपटांना पठाणमुळे मल्टिप्लेक्समध्ये स्क्रीन्स मिळत नाहीएत.. तेव्हा मनसेने थेट मल्टिप्लेक्सनाच बांबू लावू असा इशारा दिलाय.. बॉलिवूडसाठी शाहरुख खानचा पठाण (Pathan) सिनेमा मोठी घटना आहे.. मात्र त्यासाठी मराठी चित्रपटांचा बळी का द्यायचा.. मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा मिळायलाच पाहिजे अशी मागणी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopar) यांनी केलीय.

25 Jan 2023, 12:27 वाजता

पुण्यात इन्स्टाग्राम स्टेटसवरुन राडा

Pune Rada : उरुळी कांचन इथल्या पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये इंस्टाग्रामवर ठेवण्यात आलेल्या स्टेटसवरून तुंबळ हाणामारी झाली. या विद्यार्थ्यांनी लोखंडी स्टिक, लाकडी दांडके अशा हत्यारांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. दोन्ही गटांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दोन्ही गटातील विद्यार्थी बारावीमध्ये शिकतात. दोन्ही गटातील फिर्यादी तरुणांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकमेकांना खिजवणारे स्टेटस ठेवलेले होते. या स्टेटस संदर्भात एकमेकांना आक्षेप होते. या स्टेटस बाबत कॉलेजच्या पार्किंगमध्ये एकमेकांना जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाली. या वादाचे पर्यावसन मारहाणीमध्ये झाले. दोन्ही गटातील एकूण ११ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी पाहा - पुण्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान राडा, लोखंडी रॉडने मारहाण

25 Jan 2023, 12:01 वाजता

'त्या' 7 जणांची आत्महत्या नाही हत्याच

Daund Crime Update : भीमा नदीत सापडलेल्या मृतदेहांचं गुढ अखेर उकललंय.. भीमा नदीच्या पात्रात सापडलेल्या त्या सात जणांची हत्याच झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलीय.. मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी आणि जावई यांच्यासह 3 लहान मुलांचे मृतदेह नदीत सापडले होते. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती.. पवार कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र मृत मोहन पवार यांच्या चुलत भावांनी हत्या करुन मृतदेह नदीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल दुपारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत.

बातमी पाहा - भीमा नदीत सापडलेल्या 'त्या' 7 मृतदेहांबाबत नवीन ट्विस्ट, चुलत भावांनी नदीत...

25 Jan 2023, 11:47 वाजता

लॅपटॉप, फ्रीझमधून चीनची हेरगिरी

China Hacking Laptop : तुम्ही मेड इन चायना लॅपटॉप, फ्रीज किंवा मिक्सर वापरताय तर सावधान. आपण वापरत असलेले लॅपटॉप, फ्रीज आणि मिक्सरसारख्या उपकरणांमधल्या मायक्रोचिपद्वारे चीन (China) हेरगिरी करतोय... या वस्तूंमधल्या चीपमधून चीन तुमच्या घरात डोकावतोय.. तुमची सर्व खासगी माहिती चोरतोय.. हा धोक्याचा इशारा ब्रिटिश सरकारनेच आपल्या नागरिकांना दिलाय.. कारमध्ये वापरल्या जाणा-या पार्ट्समध्येही चिप बसवण्यात आलीय.. स्मार्टफोनच्या (Smart Phone) माध्यमातून आपल्या बँक खात्याशी संबंधित प्रत्येक माहिती चिनकडे पोहोचतेय.. फोन बंद असला तरीही आपले व्हिडिओ-ऑडिओ रेकॉर्ड होतायत.. आपल्या घरातलं सीसीटीव्ही फुटेजही चीनमध्ये पोहोचतेय अशी धक्कादायक माहिती सायबर तज्ज्ञांनीही दिलीय.

बातमी पाहा - सावधान ! लॅपटॉप, फ्रीझ, मिक्सरमधून चीनची हेरगिरी

25 Jan 2023, 11:39 वाजता

कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान

Pune ByPoll Election Dates : राज्यात होणा-या पोटनिवडणुकांबाबतची सर्वात मोठी बातमी.... एकीकडे उमेदवारीसाठी राजकीय रणकंदन सुरु असताना आता मतदानाची तारीखच बदलण्यात आली आहे.. कसबा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोटनिवडणूक आता 26 फेब्रुवारीला होणार आहे तर दोन्ही जागांची मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. आधी हे मतदान 27 फेब्रुवारीला होणार होतं. राज्यात याच दरम्यान 12वीच्या परीक्षा होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत... कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं 22 डिसेंबरला निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे  आमदार लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारीला निधन झालं होतं. या दोन्ही आमदारांच्या जागी आता पोट निवडणूक घेतली जाणार आहे.

बातमी पाहा - कसबा, चिंचवड पोट निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल! जाणून घ्या नवी तारीख

25 Jan 2023, 11:16 वाजता

कोपरगावात घरावर उल्कापात?

Kopargaon Meteor : कोपरगाव तालुक्यातल्या भोजडे गावात उल्का सदृश वस्तू आढळलीय. किरण ठाकरे यांच्या घरात ही वस्तू सापडलीय. छताचा पत्रा फोडून वस्तू घरात येऊन पडल्यानं ठाकरे कुटुंबात घबराटीचं वातावरण आहे. सुदैवानं यात कुणालाही इजा झाली नाही. मात्र घराच्या छताचा पत्रा तुटलाय. ज्या ठिकाणी ही वस्तू पडली त्याठिकाणी जमिनीवर खड्डा पडून नुकसान झालंय. सुरुवातीला जोरदार आवाज झाल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लढवले गेले. नेमकी ही वस्तू काय आहे हे कुणालाही कळत नव्हतं. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर ही वस्तू उल्का सदृश वस्तू असल्याचं निदर्शनास आलं. या वस्तूचे नमुने तपासण्यासाठी पोलिसांनी ती ताब्यात घेतलीय. खगोलशास्त्र विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलीय. 

बातमी पाहा - पत्रा फोडून घरात पडली उल्कासदृश वस्तू