Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्या ठाणे दौऱ्यावर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Uddhav Thackeray  : उद्धव ठाकरे उद्या ठाणे दौऱ्यावर

25 Jan 2023, 10:56 वाजता

तलाठ्यांची 4 हजार पदं भरणार

Talathi Employment : सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी... गेली अनेक वर्ष रखडलेली तलाठीपदाची भरती आता लवकरच होणार आहे.. सुमारे चार हजार तलाठीपदं भरली जाणार आहेत.. महसूल विभागाच्या कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातल्या सर्व जिल्ह्यांमधली रिक्त पदं भरली जातील. मार्चपूर्वी ही ऑनलाईन पदभरती होणार असून लवकरच पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. संपूर्ण भरती प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी भूमिअभिलेख विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांकडे राज्य समन्वयकाची जबाबदारी देण्यात आलीय. 

बातमी पाहा - राज्यात 4 हजार तलाठी पदासाठी होणार भरती 

25 Jan 2023, 09:53 वाजता

ठाकरे गट आणि भाजपमध्ये राडा

Sindhudurga Rada : कणकवलीच्या (Kankawali) कनेडी गावात काल राजकीय शिमगा पाहायला मिळाला... भाजप (BJP) आणि ठाकरे गटाच्या (Thacekray Group) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.. मात्र आता यातला आणखी एक व्हिडिओ समोर आलाय.. ज्यात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) हातात दांडा घेऊन आवेशात भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जात असल्याचं दिसतंय. कनेडीतल्या राड्याची सुरुवात भाजप आणि ठाकरे गटाच्या पदाधिका-यांच्या बाचाबाचीनं झाली. मात्र नंतर त्याचं रुपांतर हाणामारीत झालं.. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन उतरले.. आवेशात ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले.. पोलिसांनी वैभव नाईकांना अडवलं नाहीतर परिस्थिती चिघळली असती असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. 

बातमी पाहा - ठाकरे गट - भाजपमध्ये राडा! वैभव नाईक हातात रॉड घेऊन अंगावर धावत सुटले

25 Jan 2023, 09:42 वाजता

आयटी कंपन्यांची 40 हजार कर्मचारी कपातीची घोषणा

IT Jobs Cut : नव्या वर्षात जगातल्या तीन मोठ्या आयटी कंपन्यांनी 40 हजार कर्मचारी कपात करण्याची घोषणा केलीय... मात्र नोकरी जाण्याचा सर्वात जास्त धोका तीन विभागांमधल्या कर्मचा-यांना आहे... मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) माजी HR उपाध्यक्ष ख्रिस विल्यम्स यांनी याबाबत धोक्याची घंटा वाजवलीय... तुम्ही देखील या तीन विभागांत काम करत असाल तर सावधान व्हा... सर्वात जास्त धोका आहे तो कंत्राटी कर्मचा-यांना.. त्यानंतर नवीन संशोधन करणा-या विभागातल्या कर्मचा-यांचा नंबर लागू शकतो.. इव्हेंट मॅनेजमेंट विभागातल्या कर्मचा-यांचा तिसरा नंबर लागतो असं  मायक्रोसॉफ्टच्या माजी HR उपाध्यक्षांनी म्हटलंय. सर्वात कमी फटका HR विभागाला बसत असल्याचं त्यांनी म्हटलंय..

बातमी पाहा - 40 हजार कर्मचाऱ्यांच्या एका क्षणात जाणार नोकऱ्या

25 Jan 2023, 09:33 वाजता

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका ईडीच्या रडारवर

Covid Center Scam : मुंबईनंतर आता पुणे (Pune Municipal Corporation ) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) ईडीच्या रडारवर आल्यात... कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये (Covid Center) झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी ईडी (ED) करणार असल्याची माहिती मिळतेय. ईडीने या दोन्ही महानगरपालिकांकडून माहिती मागवल्याचं सोमय्यांनी (kirit Somaiya) म्हटलंय.. कोरोना काळात जम्बो कोविड सेंटर चालवण्यासाठी महापालिकांनी कंत्राटं दिली होती.. एका चहावाल्याच्या नावाने कंत्राट घेतल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. तसंच ईडीकडे तक्रार करत चौकशीची मागणीही केली होती. याआधी कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची चौकशी केली होती..  तेव्हा आता पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातमी पाहा - मुंबई महानगरपालिका मागोमाग आता पुणे मनपाची ईडी चौकशी होणार

25 Jan 2023, 09:04 वाजता

सोनं महागलं, तस्करीमध्ये वाढ

Gold Smuggling : भारतात सोनं महागलंय तशी सोन्याची तस्करी करण्याच्या संख्येतही वाढ झालीय... गेल्या वर्षभरातच थोडीथोडकी नव्हे तर 4 हजार टन सोन्याची तस्करी (Gold Smuggling) भारतात करण्यात आल्याचं समोर आलंय..  सोने तस्करी करणा- रॅकेटचा पर्दाफाश महसूल गुप्तचर संचालनालय अर्थातच डीआरआयने केलाय... मुंबई एअरपोर्टवर काल 21 कोटी रुपयांचं 36 किलो सोनं, तसंच 20 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांचा समावेश असलेलं सिंडिकेट तस्करी केलेल्या सोन्याच्या प्रक्रियेत आणि वितरणात असल्याचं डीआयआरने म्हटलंय. तसंच सोन्याच्या तस्करीचे पैसे हवाला चॅनेलद्वारे वितरीत होत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. त्यानंतर हे पैसे देशविघातक कृत्यांसाठी वापरले जात असल्याची माहितीही यंत्रणांनी दिलीय.

बातमी पाहा - धक्कादायक! एका वर्षात 4 हजार टन सोन्याची तस्करी

25 Jan 2023, 08:17 वाजता

मुंबईत 30 आणि 31 जानेवारीला पाणीपुरवठा बंद

Mumbai Water Cut : मुंबईतील (Mumbai) काही भागात  30 आणि 31 जानेवारीला पाणीकपात (Water Cut) करण्यात येणारेय. यासंदर्भात बीएमसीकडून माहिती देण्यात आलीय. भांडुप संकुल इथल्या जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4 हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम महापालिकेकडून हाती घेण्यात येणारेय. तसंच भांडुप (Bhandup) संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर 2 ठिकाणी झडपा बसविणं, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणं आणि 2 ठिकाणी उद्भवलेली गळती करण्यासाठी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणारेय. 

बातमी पाहा - मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद

25 Jan 2023, 08:07 वाजता

मेट्रो 2 अ, मेट्रो 7 मुळे घरांच्या किमतीत वाढ

Mumbai Home Price Hike : पश्चिम उपनगरात जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर आता जास्त पैसे मोजावे लागतील... कारण नव्या मेट्रोमुळे पश्चिम उपनगरात (Western Suburbs) घरांसाठी मागणी वाढलीय... एवढंच नाही तर घरांच्या किंमतीत 5 ते 45 टक्क्यांपर्यंत वाढ झालीय.. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रो 2-अ (Metro 2A) आणि मेट्रो सातचं (Metro 7) उद्घाटन केलं.. आणि वाहतूक कोंडीतून सुटका होत अंधेरी-दहिसर प्रवास सुकर झाला.. तेव्हा या पट्ट्यात जागांचे दर 20 ते 50 हजार स्क्वेअर फूटवरून थेट 70-80 हजार स्क्वेअर फूटवर गेलेत. खासकरुन गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि दहिसरमधल्या घरांसाठी मागणी वाढलीय. घरांची विक्री वाढल्यानं विकासकांनीही दर वाढवत त्याचा फायदा उचलला..

25 Jan 2023, 07:50 वाजता

बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरुन जेएनयूमध्ये रणकंदन

Delhi JNU Rada : नवी दिल्लीतली जेएनयू पुन्हा वादात अडकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासंदर्भात बीबीसीने तयार केलेली डॉक्युमेंटरी (BBC Documentary) जेएनयूमध्ये दाखवण्यावरून रणकंदन पेटलंय. मंगळवारी ही डॉक्युमेंटरी दाखवण्यावरून जेएनयूत (JNU) जोरदार राडा झाला होता. कॅम्पसमध्ये दगडफेकही (Stone Pelting) झाली. वीजपुरवठाही कापण्यात (Electricity Cut) आला. वीज नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी क्युआर कोड डाऊनलोड करून ही फिल्म पाहिली. याविरोधात JNUSU या विद्यार्थ्यांच्या डाव्या संघटनेने प्रशासनाविरोधात तसंच पोलिसांविरोधात वसंत कुंज पोलीस स्टेशनसमोर जोरदार घोषणाबाजी केली. 

बातमी पाहा - JNUमध्ये दगडफेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डॉक्युमेंटरीवरुन राडा

25 Jan 2023, 07:19 वाजता

राज्यात माघी गणेश जयंतीचा उत्साह

Maghi Ganesh Jayanti : आज माघी गणेश जयंती आहे. त्यानिमित्त उत्साह दिसून येतोय. सिद्धीविनायक (Siddhivinayak Temple), दगडूशेठ मंदिरासह (Dagdusheth Temple) राज्यभरातल्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून येतेय. माघी गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिरात सोन्याचा पाळणा आणण्यात आलाय.