Maharashtra News Live Updates: एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

Maharashtra News Updates: Live Marathi News : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, राजकीय, आरोग्य, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे वेगवान live अपडेट्स  

Maharashtra News Live Updates: एका क्लिकवर दिवसभरातील बातम्या

20 Nov 2022, 07:32 वाजता

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुसरी टी-20 मॅच, भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीवर नजर

 

India Vs Newzeland 2nd T-20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुसरी टी-20 मॅच रंगणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिलीय. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचं (Team India) नेतृत्व करणार आहे. दोन्ही टीममधील पहिली मॅच पावसामुळं (India vs Newzeland) रद्द झाली त्यामुळं आजची मॅच जिंकून विजयी सलामी देण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरेल. 

बातमी पाहा - IND vs NZ: क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी, भारत - न्यूझीलंडमधील दुसऱ्या T20 सामन्यावर पावसाचे सावट

 

20 Nov 2022, 07:05 वाजता

मध्य रेल्वेवरील कर्नाक पुलाचं तोडकाम सुरू,  मध्य, हार्बरवरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द, लांबपल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम

 

Central Railway Megablock : मुंबईतला कर्नाक पूल (carnac bridge) पाडण्याचं काम सुरू झालंय. त्यामुळे मध्य रेल्वेचा 27 तासांचा मेगाब्लॉक (Central Railway Megablock) सुरू झालाय. काल रात्री 11 वाजल्यापासून पूल पाडण्यासाठी या मेगाब्लॉकला सुरूवात झाली. त्यामुळे आज सीएसएमटी-भायखळा (CSMT-byculla), सीएसएमटी- वडाळादरम्यान (CSMT-Wadala) लोकल फेऱ्या चालविण्यात येणार नाहीत. 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. आज दुपारी 4 वाजेपर्यंत वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर आज गाड्यांच्या फेऱ्या भायखळ्यापर्यंतच होणार आहेत. हार्बर मार्गावरील 21 तासांचा ब्लॉक सीएसएमटी – वडाळय़ादरम्यान शनिवारी रात्री 11 वाजता सुरू झाला असून तो रात्री 8 वाजता संपुष्टात येईल. मेल एक्स्प्रेस यार्डलाइनची वाहतूक 27 तासांनंतर म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजता सुरू होईल. 

बातमी पाहा - Mega Block News : 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!