Good News for Teaching staff : शिक्षणसेवकांसाठी मोठी खुशखबर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Good News for Teaching staff : शिक्षणसेवकांसाठी मोठी खुशखबर

7 Feb 2023, 23:40 वाजता

शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ होणार

Good News for Teaching staff : शिक्षणसेवकांच्या(Teaching staff) मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. सर्व वर्गांच्या शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आलीय. ही मानधन वाढ दुपटीपेक्षा जास्त आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतल्या शिक्षणसेवकांचं मानधन 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपये करण्यात आलंय. तर माध्यमिकच्या शिक्षण सेवकांचं मानधन 8 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलंय. उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षकांचं मानधन 9 हजार रुपयांवरुन 20 हजार रूपये करण्यात आलं.  
नवी मानधन वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.

बातमी पाहा - शिंदे सरकारचा मोठा निर्णय! शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात मोठी वाढ

 

 

7 Feb 2023, 22:22 वाजता

आदित्य ठाकरेंच्या सभास्थळी जोरदार राडा

Attempt to block Aditya Thackeray's Car : संभाजीनगरातल्या वैजापूरमध्ये आदित्य ठाकरेंची(Aditya Thackeray) सभा संपल्यानंतर जोरदार राडा झाला. आदित्य ठाकरेंच्या वाहनांचा ताफा सभास्थळावरून निघत असताना काही तरुण त्याठिकाणी आले. त्यांनी आदित्य ठाकरेंची कार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलीस आणि संतप्त तरुण यांच्यात चांगलीच झटापट झाली. पोलिसांनी या तरुणांना रोखलं आणि त्यानंतर आदित्य ठाकरे तिथून रवाना झाले.

बातमी पाहा - संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभास्थळी जोरदार राडा, आधी दगडफेक नंतर कार अडवण्याचा प्रयत्न

 

7 Feb 2023, 21:29 वाजता

संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या स्टेजवर भिरकावला दगड

Stone thrown on Aditya Thackeray's stage : संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंची(Aditya Thackeray) वैजापूर येथे सभा सुरु असताना अज्ञातानं स्टेजवर दगड भिरकवल्याचा प्रकार घडला. त्याचवेळी रमाई मिरवणूक समोरून जात असल्यामुळे गोंधळ उडाला. चंद्रकांत खैरेंचं(Chandrakant Khaire) भाषण सुरु असताना स्टेजवर दगड भिरकवण्यात आला. घडलेल्या प्रकारानंतर वाद टाळण्यासाठी आदित्य ठाकरेंनी स्टेजवरून खाली उतरून आवाहन केलं. डीजे वाजवा मात्र वाद नको असं मिरवणुकीतल्या तरुणांना आदित्य ठाकरेंनी सांगितलं. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र असल्याची आठवणही आदित्य ठाकरेंनी यावेळी करुन दिली. 

 

7 Feb 2023, 17:11 वाजता

संशयित अतिरेक्याला अटक

Suspected Terrorist Arrested : मुंबई विमानतळ (Mumbai Airport) बॉम्बने उडवून देण्याची धमकी. इंडियन मुजाहिद्दीनच्या नावानं धमकी देणाऱ्या 28 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी गोवंडीतून अटक केलीय. मुंबई विमानतळ स्फोटानं उडवून देण्याची धमकी त्यानं दिली होती. वेब सिरीज पाहून त्यानं धमकीचा प्लॅन बनवला असावा, असा पोलिसांनी संशय आहे. त्यादृष्टीनं पोलिसांनी चौकशी सुरू केलीय. हा तरुण मानसिक रुग्ण आहे का, याचीही तपासणी पोलीस करत आहेत.

7 Feb 2023, 15:23 वाजता

अदानींवर हल्ला, मोदींवर निशाणा

 

Rahul Gandhi : लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अदानींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Mininster Narendra Modi) जोरदार निशाणा साधलाय. सार्वजनिक क्षेत्राचा पैसा मोदींनी अदानींना (Gautam Adani) दिला... मोदी विदेशात जिथे जिथे गेले तिथला व्यवसाय त्यांनी अदानींना मिळवून दिला, असा आरोप राहुल गांधींनी केला. यावेळी त्यांनी काही फोटो लोकसभेत (Loksabha) दाखवले.... तर राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार भाजप नेते रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) यांनी केलाय. 

7 Feb 2023, 15:08 वाजता

काटे आणि कलाटेंचे कार्यकर्ते आमनेसामने.

 

Chinchwad ByPoll Election : चिंचवडमध्ये नाना काटे (Nana Kate) आणि राहुल कलाटे यांचे (Rahul Kalate) कार्यकर्ते आमनेसामने आले. राष्ट्रवादीकडून नाना काटेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नाना काटे आणि अजित पवार बाहेर आले. त्यावेळी राहुल कलाटे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले. त्यावेळी काटे आणि कलाटेंचे कार्यकर्ते समोरासमोर आले.

बातमी पाहा - नाना काटे- राहुल कलाटे कार्यकर्ते आमने-सामने; चिंचवडमध्ये तणाव

7 Feb 2023, 13:46 वाजता

जळगावमध्ये केळींचा तुटवडा

 

Jalgav Banana : केळींसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावातच सध्या केळींचा तुटवडा निर्माण झालाय.. त्यामुळे जळगावमध्ये 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव देऊनही सर्वसामान्यांना केळी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हयातील 80 हजार हेक्टर पैकी पंधरा ते वीस हजार हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागांवर सीएमव्ही व्हायरसचा प्रादूर्भाव झालाय. यंदा थंडीचा लांबलेला सिझन सुद्धा उत्पादकांसाठी अडचणीचा ठरलाय.. त्यामुळे केळीच्या उत्पादनात मोठी घट झालीये... जळगावच्या केळीला विदेशातही मोठी मागणी असते.. रोज 500 कंटेनर केळीची निर्यात एकट्या जळगावातून होते... मात्र सध्या ही निर्यात 65 ते 70 कंटेनरवर आलीये.. त्यामुळे शेतकरीही चिंतेत सापडलाय. 

7 Feb 2023, 13:08 वाजता

40 लाख लाभार्थ्यांना धान्याऐवजी पैसे?

 

Farmer Help : राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आता धान्याऐवजी थेट रक्कम मिळणार असल्याची माहिती मिळतेय. 14 जिल्ह्यातल्या 40 लाख लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य देण्याची याआधी योजना होती. मात्र आता धान्याऐवजी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. कुटुंबातल्या प्रत्येकी एका व्यक्तीला महिन्याला दीडशे रुपये मिळतील. याचा अर्थ 4 जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी 36 हजार रुपये मिळतील.. कुटुंबातल्या महिलेच्या बँक खात्यात हे सर्व पैसे जमा होणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच यावर निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

बातमी पाहा - शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळांचा मोठा निर्णय! अन्नधान्य ऐवजी सरकार देणार आर्थिक अनुदान

7 Feb 2023, 12:49 वाजता

भाजपमध्ये येणा-यांसाठी पक्षाचे दरवाजे खुले  - बावनकुळे

 

Chandrashekar Bawankule : काँग्रेसमधील (Congress) नाराजीनाट्याशी भाजपचा काही संबंध नाही, पण भाजपमध्ये येण्याची इच्छा असलेल्यांसाठी पक्षाचे दरवाजे खुले आहेत असं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी म्हटलंय. थोरातांच्या (Balasaheb Thorat) राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंच्या या विधानाने भुवया उंचावल्या आहेत. 

7 Feb 2023, 12:17 वाजता

कसबा पेठेत काँग्रेसमध्ये बंडखोरी

 

Kasba ByPoll Election : पुण्यात कसबापेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी झालीय. पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dhabekar) आज कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा (Kasba ByPoll Election) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी ते बाईक रॅली काढत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ऱॅलीनंतर ते अर्ज दाखल करतील. कसबापेठ पोटनिवडणूक काँग्रेसचे रविंद्र धंगेकर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र आता दाभेकरांची बंडखोरी मोडून काढण्याचं आव्हान काँग्रेस नेतृत्वापुढे असेल. 

बातमी पाहा - कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी! बाळासाहेब दाभेकर भरणार उमेदवारी अर्ज