100 दिवसात पुढच्या 25 वर्षांची सोय; महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाची अव्वल कामगिरी

100 दिवसांचा आराखडा उपक्रमात ऊर्जा विभागाने बाजी मारली आहे. 25 वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 24, 2025, 04:37 PM IST
100 दिवसात पुढच्या 25 वर्षांची सोय; महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाची अव्वल कामगिरी

100 Days Program Of Maharashtra Government : राज्याच्या विकासासाठी 100 दिवसांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून सर्व विभागांना ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या. 100 दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल ठरला आहे. ऊर्जा विभागाने 100 दिवसात पुढच्या 25 वर्षांची सोय केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऊर्जा विभागाचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित करण्यात आले.  ऊर्जा विभागाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी यासाठी पुढाकार घेतला.  पुढील 25 वर्षांचा ऊर्जा विभागाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 
देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा खात्याची स्वतःच्या विभागापासून सुरूवात केली आहे. 100 दिवसांचा टास्क सर्वात आधी पूर्ण करण्यात ऊर्जा विभागाने बाजी मारली आहे. 

सौर ऊर्जेच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळणार आहे. तसेच मागेल त्याला सौर पंप देण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे. वीजेचे दर कमी करण्यावरही ऊर्जा विभागाचा भर आहे.